टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा

सांगोला ( प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यातील कडलास परिसरात माण नदीजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. 27 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 2.40 वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सागर जाधव (वय 27) व सुजाता जाधव (वय 24, रा. वाकी , ता. सांगोला, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे.

माण नदीजवळ कडलास येथे अपघात झाल्यानंतर जखमी अवस्थेत दोघांना उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केली असता दोघांचाही उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालयाकडून एमएलसीद्वारे पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार सांगोला पोलिसांनी मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास संबंधित पोलीस अधिकारी करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, तरुण दाम्पत्याच्या अकाली निधनामुळे शोककळा पसरली आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now