टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला-महूद रोडवर हृदयद्रावक अपघात; अपघाताने हिरावला आक्रमक चेहरा

सांगोला – भरधाव ट्रेलरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने भीषण अपघातात मागील डाव्या बाजूच्या टायर खाली सापडून फरफटत गेल्याने उद्धवसेनेच्या मंगळवेढा तालुका प्रमुखाचा चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात काल गुरुवार १८ जून रोजी दुपारी ४ च्या सुमारास सांगोला- महुद रोडवरील उड्डाणपुलाच्या जवळ घडला. दरम्यान अपघातानंतर ट्रेलर चालक स्वतःहून पोलिसात हजर झाला. तुकाराम दामू भोजने ( वय-६०,रा नंदूर ता मंगळवेढा) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे

याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ अंकिता कदम यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मृत नंदुर येथील तुकाराम भोजने हे काल गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास त्यांच्या एम एच -१३ डब्ल्यू-९९९९ बुलेट दुचाकीवरून सांगली -सोलापूर महामार्गावरील सर्विस रोड वरून सांगोला मार्गे मंगळवेढा कडे निघाले होते नेमके त्यावेळेस सांगोल्याकडून अवजड साहित्य घेऊन भरधाव वेगाने पुण्याकडे जाणाऱ्या एम एच-४६-सीयु-९३२७ या ट्रक ट्रेलरची महूद उड्डाणपुलाजवळ डाव्या बाजूने बुलेट जोराची धडक बसून हा भीषण अपघात झाला.

धडक इतकी भीषण होती की, तुकाराम भोजने बुलेटवरून उडून थेट ट्रेलरच्या डाव्या टायर खाली सापडून सुमारे १०० फूट फरफटत गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार बजरंग बोराटे, सचिन भोसले व वाहतूक शाखेचे नितीन घुले यांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रेलरच्या टायर खाली अडकलेला मृतदेह बाजूला काढून मदत केली व मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदन करिता सांगोला ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला.पुढील तपास पोलीस हवालदार बजरंग बोराटे करीत आहेत.

” मृत तुकाराम भोजने हे सुरुवातीच्या काळापासून शिवसेनेत सक्रिय राहून तळागाळातील जनतेचे प्रश्नावर आवाज उठवून सोडवत होते. सध्याच्या राजकीय घडामोडीत उद्धवसेनेशी एकनिष्ठ व आक्रमकपणे पक्षाची बाजू लावून धरणारा एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे नंदुर गावासह मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now