टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

जुनोनी येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार

सांगोला : जुनोनी गावाजवळील राष्ट्रीय महामार्गाला मिळणार्‍या रस्त्यावर भरधाव दुचाकीच्या धडकेत एका पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक आलदर (वय 43, रा. कोळा, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 2 मे रोजी सायं.7.30 च्या सुमारास जुनोनी गावातील राष्ट्रीय महामार्गाला मिळणार्‍या रस्त्यावर नारायण पाटील यांच्या शेताजवळ हा अपघात घडला.

या अपघातात श्रीमंत व्हनमाने हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ उपचारासाठी सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी भारती हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघातानंतर चालकाने जखमींना मदत न करता दुचाकीसह घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका/1242 बनसोडे करीत आहेत.

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now