सांगोला (प्रतिनिधी):- डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय व अॅक्सिस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हचे उद्या मंगळवार दि.12 मे रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुसा मुलाणी यांनी दिली.
सदर कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हसाठी महाविद्यालयातील सर्व विभागातील पदवीच्या तृतीय वर्षास असणार्या सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे. कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हसाठी येताना सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी ठीक 10:30 वाजता युनिफॉर्म घालून सोबत आयडेंटिटी कार्ड घेऊन महाविद्यालयात उपस्थित राहावे.

















