टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र होण्याकरिता प्रत्येक संघाला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या गणित

आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफची रंगत वाढली आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाने प्लेऑपमध्ये जागा मिळवलेली नाही. इतकंच काय या स्पर्धेतून कोणत्याही संघाची शर्यत संपलेली नाही. अशा स्थितीत 48 सामन्यांचा खेळ संपल्यानंतर कोणत्या संघाला किती सामने जिंकणं भाग आहे ते समजून घेऊयात..

IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र होण्याकरिता प्रत्येक संघाला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या गणित

आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफची शर्यत रंगतदार वळणावर आली आहे. टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेंच सुरू आहे. अजून कोणत्याही संघाने प्लेऑफमधील जागा निश्चित केलेली नाही. त्यामुळे टॉप 4 मध्ये कोणते संघ असतील याबाबत उत्सुकता आहे. काही संघांसाठी प्लेऑफचं गणित सोपं आहे. तर काही संघांसाठी करो या मरोची स्थिती आहे. असं असताना कोणत्या सघाला किती सामने जिंकणं भाग आहे, याचं गणित पाहूयात.

प्लेऑफचं समीकरण काय ते जाणून घ्या

पंजाब किंग्स: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स संघाने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. या 9 सामन्यांपैकी 6 सामने जिंकलेला पंजाब संघ एकूण १३ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे 17 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पंजाब किंग्सला पुढील5 सामन्यांमध्ये फक्त 2 सामने जिंकावे लागतील.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू: रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 16 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी पुढील 5 सामन्यांपैकी 2 सामने जिंकावे लागतील.

सनरायझर्स हैदराबाद: पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद संघाने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यांनी त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत. सध्या 12 गुण असलेल्या हैदराबाद संघा पुढील 4 सामन्यांपैकी 2 सामने जिंकल्यास प्लेऑफचं गणित सुटेल.

राजस्थान रॉयल्स: रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सनेही 10 सामने खेळले आहेत. सहा सामने जिंकून 12 गुणांची कमाई केली आहे. राजस्थान रॉयल्स संघाने पुढील 4 सामन्यांपैकी 2 सामने जिंकल्यास 16 गुण होतील आणि प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो.

गुजरात टायटन्स: शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सनेही 10 सामने खेळले आहेत. सहा सामने जिंकले असून 12 गुण आहेत. गुजरात टायटन्स पुढील 4 सामन्यांपैकी 2 सामने जिंकल्यास 12 गुण होती आणि प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो.

चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामने जिंकले असून 10 गुण आहेत. उर्वरित चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकल्यास प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो.

दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने 10 सामने खेळले असून 4 सामन्यात विजय मिळवला आहे. सध्या 8 गुण असून आणखी 8 गुणांची गरज आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाला चार पैकी चार सामने जिंकणं भाग आहे. तसं झाल्यास थेट प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो.

कोलकाता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. केकेआरने तीन सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने 1 गुण मिळाला आहे. सध्या 7 गुण असलेला केकेआर पुढील 5 सामने जिंकल्यास 17 गुणांसह थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.

मुंबई इंडियन्स: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी केवळ 3 सामने जिंकले आहेत. उर्वरित 4 सामने जिंकले तरी 14 गुण होतील. त्यामुळे जर तरचं गणित असेल. मुंबई इंडियन्स नेट रन रेटच्या जोरावर चौथ्या स्थानावर राहून प्लेऑफमध्ये पोहोचू शकते.

लखनौ सुपर जायंट्स: ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने आपल्या 9 सामन्यांपैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. सध्या केवळ 4 गुण असलेल्या लखनौला आपले पुढील 5 सामने जिंकून एकूण 14 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्ससारखी स्थिती आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम, सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्त, Video Viral

IND vs SL: श्रीलंकाविरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

6,6,4,4,4,4..! वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेला दणका, पुन्हा ठोकलं दणदणीत अर्धशतक

Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral

वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून ‘क्लासिक’ षटकार, पाहा Video