टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Price Today : सोन्याचे दर गडगडले, चांदीचीही चमक फिकी, खरेदीपूर्वी जाणून घ्या दर पटापट…

Gold Price Today 20 June 2026 Latest News Updates in Marathi : प्रामुख्याने डॉलरच्या मजबुतीकरणामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींवर दबाव आला आहे. देशातील सोन्याचे भाव घसरले असून प्रमुख शहरातील 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर किती ते जाणून घेऊया..

Gold Price Today : सोन्याचे दर गडगडले, चांदीचीही चमक फिकी, खरेदीपूर्वी जाणून घ्या दर पटापट...

देशांतर्गत सोन्याच्या भावात घसरण काय आहे. आज देशभरात सोन्याचे भाव आणखी घसरले आहेत, यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी, 20 जूनच्या सकाळी राजधानी दिल्लीत 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,46,000 पयांपर्यंत खाली आला. त्याआधीच्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9% शुद्ध सोन्याच्या दरात 2840 रुपयांची मोठी घसरण होऊन तो प्रति 10 ग्रॅम 1,50,600 रुपयांवर स्थिरावला होता. प्रामुख्याने डॉलर वधारल्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे; डॉलर इंडेक्सने गेल्या एका वर्षातील उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’चा (तात्काळ खरेदी-विक्रीसाठीचे सोने) व्यवहार प्रति औंस4148,45 डॉलर्सवर होत आहे.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

राजधानी दिल्लीत 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 1,46,000 रुपयांना तर 22 कॅरेट सोनं 1,33,840 रुपयांना मिळतंय. तर मुंबई आणि कोलकाता येते 22 कॅरेटच्या 10 ग्रॅमचा भाव 1,33,690 आणि 24 कॅरेटचा दर 1,45,850 रुपये इतका आहे.

चेन्नईत सोन्याचे दर सर्वाधिक असल्याचे दिसून आले. 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं चेन्नईत 1,48,030 रुपयांना आणि 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,35,690 रुपये इतका आहे. तसेच पुणे आणि बंगळुरूमध्ये 24 कॅरेटचं सोनं 1,45,850 रुपये आणि 22 कॅरेट सोनं हे 1,33,690 रुपयांना आहे.

फेडरल रिझर्व्हचे अधिकारी केविन वॉर्श यांच्या विधानांवरून असे सूचित होते की, जर अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत राहिली, तर 2026 मध्ये व्याजदरात एकदा वाढ होऊ शकते. मात्र सोन्यासारख्या मौल्यवान धातूंसाठी ही एक नकारात्मक बाब आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 133840 146000
मुंबई 133690 145850
अहमदाबाद 133740 145900
चेन्नई 135690 148030
कोलकाता 133690 145850
हैदराबाद 133690 145850
जयपुर 133840 146000
भोपाळ 133740 145900
लखनऊ 133840 146000
चंदीगड 133840 146000

चांदीचे दर

आज सोन्याप्रमाणेच देशात चांदीचे दरही घसरले, 20 जून रोजी चांदीची किंमत घसरून 2,49,900 रुपये प्रतिकिलो ग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदीची किंमत प्रति औंस 64.73 डॉलर्स इतकी आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Pawanraje Nimbalkar Case: ओमराजे निंबाळकरांना सर्वात मोठा धक्का, पवनराजे खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, पद्मसिंह पाटीलही सुटले

आता नुसता धो धो पाऊस बरसणार, या तारखेनंतर राज्यभरात काळे ढग; हवामान विभागाचा नवा अंदाज आला !

El Nino : यंदा पाऊस रडवणार.. पुढील 5 महिने भारतासाठी कठीण; ‘एल निनो’चा कहर वाढणार?

Horoscope Today 19th June 2026 : या 5 राशींना मिळणार मोठी खुशखबर, आर्थिक बाबतीत कोणाची चांदी? वाचा आजचे भविष्य

Sahel Terrorism : नायजरमधील नियामे विमानतळावर भीषण दहशतवादी हल्ला; 11 सैनिकांसह 13 जण ठार; 22 हल्लेखोरांचाही खात्मा

गद्दार बदलले, चेहरे बदलले पण विचार नाही.. ठाकरे गटाकडून सणसणीत चपराक, मुंबईभर बॅनर्स लावत हल्लाबोल