टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

IND vs AFG : केएल-शुबमनचं कडक शतक, टीम इंडियाच्या पहिल्या दिवशी अफगाणिस्तान विरुद्ध 368 धावा

India vs Afghanistan Test Day 1 Highlights : न्यू चंडीगडमधील मुल्लानरपूरमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी भारताच्या दोघांनी शतक झळकावलं. टीम इंडियासाठी केएल राहुल आणि शुबमन गिल या दोघांनी शतक ठोकलं.

IND vs AFG : केएल-शुबमनचं कडक शतक, टीम इंडियाच्या पहिल्या दिवशी अफगाणिस्तान विरुद्ध 368 धावा

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ आटोपला आहे. टीम इंडियाच्या नावावर पहिला दिवस राहिला. टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 85 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 368 धावा केल्या. टीम इंडियासाठी केएल राहुल आणि कॅप्टन शुबमन गिल या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. दोघांनीही शतक झळकावलं. साई सुदर्शन यालाही शतकाची संधी होती. मात्र साईची थोडक्यात संधी हुकली. साई आणि ऋषभ पंत या दोघांनी अर्धशतक झळकावलं. तर खेळ संपल्यानंतर शुबमन आणि ऋषभ नाबाद परतले.

टीम इंडियाची बॅटिंग

कर्णधार शुबमनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या सलामी जोडीने भारताला ठीकठाक सुरुवात मिळवून दिली. मात्र 12 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर यशस्वी जैस्वाल 24 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर केएल राहुल आणि साई सुदर्शन या दोघांनी शतकी भागीदारी केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 184 बॉलमध्ये 139 रन्सची पार्टनरशीप केली. साईच्या रुपात भारताने दुसरी विकेट गमावली. साईने 104 बॉलमध्ये 81 रन्स केल्या. साईने या दरम्यान 13 चौकार लगावले.

केएल आणि शुबमनचं शतक

त्यानंतर शुबमन गिल आणि केएल राहुल या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 106 चेंडूत 67 धावांची भागीदारी केली. या दरम्यान केएलने शतक केलं. मात्र केएल शतक करताच दुसऱ्या बॉलवर आऊट झाला. केएलने 143 चेंडूत 11 फोर आणि 1 सिक्ससह 100 धावा केल्या.

ऋषभ पंत याचं चाबूक अर्धशतक

केएल आऊट झाल्याने टीम इंडियाची स्थिती 3 आऊट 247 अशी झाली. त्यानंतर शुबमन आणि ऋषभ पंत या दोघांनी 350 पार पोहचवलं आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिले. दोघांनी 148 बॉलमध्ये नॉट आऊट 121 रन्सची पार्टनरशीप केली. शुबमन गिल 143 बॉलमध्ये 11 फोर आणि 1 सिक्ससह 103 रन्स करुन नॉट आऊट परतला. तर ऋषभ पंत याने 70 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 50 धावा केल्या.

पहिला दिवस भारताचा

तर अफगाणिस्तानकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी फक्त दोघांनाच यश आलं. मोहम्मद सलीम सफी याने दोघांना आऊट केलं. तर झियाउर रहमान शरीफी याने 1 विकेट मिळवली.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral

वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून ‘क्लासिक’ षटकार, पाहा Video

वैभव सूर्यवंशी याच्यासोबत श्रीलंकेच्या खेळाडूने केले नीच कृत्य, धक्कादायक प्रकार, थेट घरी जा..

Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक

Vaibhav Sooryavanshi : श्रीलंकेविरुद्ध जे जमलं नाही ते वैभवने अफगाणिस्तान विरुद्ध करुन दाखवलं, मोठी इनिंग खेळू शकला नाही, पण..

Team India T20I Squads : BCCI कडून आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; श्रेयस अय्यर कर्णधार, तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी