Rahmanullah Gurbaz: गुरुबाजने 25 चेंडूत अर्धशतक, तर 48 चेंडूमध्ये शतक पूर्ण करत भारतीय गोलंदाजांची पिसे काढली. अखेर तो 51 चेंडू ते 102 धावा करून बाद झाला. त्याला नितीश रेड्डीनं बोल्ड केलं.

Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा सलामीचा फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज टीम इंडियाविरुद्ध धमाकेदार फलंदाजी करताना अवघ्या 48 चेंडूत शतकी तडाखा दिला. त्यामुळे अफगाणिस्तानची तीन बाद 26 अशी नाजूक अवस्था झाली असतानाच गुरबाजने एकहाती किल्ला लढवताना अवघ्या 48 चेंडूमध्ये शतक पूर्ण करत अफगाणिस्तानसाठी सर्वात वेगवान शतक नोंदवण्याचा पराक्रम केला. भारताविरुद्ध सुद्धा हे दुसरे वेगवान शतक नोंदवले गेले.यापूर्वी 2005 मध्ये शाहिद आफ्रिदीने भारताविरुद्ध अवघ्या 45 चेंडूमध्ये शतक ठोकत भीम पराक्रम केला होता. पावसामुळे पहिला वनडे सामना 25 षटकांचा करण्यात आला असून या सामन्यातू गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे यांनी टीम इंडियाकडून पदार्पण केलं.
भारतीय गोलंदाजांची पिसे काढली
टीम इंडियाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकामध्ये गुरनूर ब्रारने इब्राहिम झद्रानला बाद करत आपली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळवली. त्यानंतर अटल सुद्धा तिसऱ्या षटकामध्ये बाद झाला. त्यानंतर अहमद शहा सुद्धा पाचव्या षटकांत बाद झाल्याने अफगाणिस्तानची अवस्था तीन बाद 26 अशी झाली.त्यानंतर गुरबाज आणि कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी यांनी संघाचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी करत अफगाणिस्तानला सावरलं. गुरुबाजने 25 चेंडूत अर्धशतक, तर 48 चेंडूमध्ये शतक पूर्ण करत भारतीय गोलंदाजांची पिसे काढली. अखेर तो 51 चेंडू ते 102 धावा करून बाद झाला. त्याला नितीश रेड्डीनं बोल्ड केलं.

गुरबाजने 21 वर्षांचा विक्रम मोडला
रहमानुल्ला गुरबाजने 48 चेंडूंमध्ये शतक झळकावले. अफगाणिस्तानकडून हे सर्वात जलद एकदिवसीय शतक आहे. यापूर्वी हा विक्रम मोहम्मद शहजाद आणि करीम सादिक यांच्या नावावर होता, ज्यांनी प्रत्येकी 72 चेंडूंमध्ये शतके केली होती. गुरबाजचे शतक हे भारताविरुद्धचे दुसरे सर्वात जलद एकदिवसीय शतक देखील आहे. हा विक्रम केवळ पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने मोडला आहे, ज्याने 2005 च्या कानपूर एकदिवसीय सामन्यात 45 चेंडूंत शतक केले होते. विशेष म्हणजे, 21 वर्षांनंतर एका फलंदाजाने भारताविरुद्ध 50 पेक्षा कमी चेंडूंमध्ये एकदिवसीय शतक झळकावले आहे.
हर्ष दुबेने पहिली एकदिवसीय विकेट घेतली
दरम्यान, पदार्पण करणाऱ्या हर्ष दुबेने आपली पहिली एकदिवसीय विकेट घेतली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असताना त्याने हशमतुल्ला शाहिदीला झेलबाद केले. ऑफ-स्टंपच्या बाहेर टाकलेल्या संथ, हवेत तरंगणाऱ्या चेंडूवर शाहिदीने स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या मधोमध लागला नाही आणि केएल राहुलने सोपा झेल घेतला. 30 चेंडूंमध्ये 27 धावा करून शाहिदी बाद झाला.
इतर महत्वाच्या बातम्या
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 13 जून 2026 | शनिवार
















