टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Pawanraje Nimbalkar Case: ओमराजे निंबाळकरांना सर्वात मोठा धक्का, पवनराजे खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, पद्मसिंह पाटीलही सुटले

Pawanraje Nimbalkar Case: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेल्या आणि दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा आज अंतिम निकाल लागला आहे.

Pawanraje Nimbalkar Case: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशलकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा (Pawanraje Nimbalkar Case) अखेर आज (२० जून २०२६) अंतिम निकाल लागला आहे. या खटल्याचा संपूर्ण पाया ज्या माफीच्या साक्षीदारावर उभा होता, त्याची साक्ष पूर्णपणे अविश्वसनीय, संशयास्पद आणि विसंगत ठरल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल खासदार ओमराजे निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबासाठी मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे.

सीबीआय विशेष न्यायालयाचे (CBI Special Court) न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांच्या कोर्ट क्र. ५५ मध्ये ही ऐतिहासिक सुनावणी पार पडली. बिहारच्या तुरुंगात असलेला मुख्य शूटर (Shooter) पिंटू सिंग याला पोलिसांनी उशिरा हजर केल्यामुळे काही काळ सस्पेन्स वाढला होता. तो न्यायालयात हजर होताच, कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयाने निकालवाचनाला सुरुवात केली.

न्यायमूर्तींचे सविस्तर निकालवाचन आणि तपासावरील ताशेरे

न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी निकालपत्राचे वाचन करताना तपास यंत्रणांच्या ढिसाळ कारभारावर आणि पोलिसांच्या चुकांवर अत्यंत गंभीर बोट ठेवले. न्यायाधीशांचे सविस्तर निकालवाचन खालीलप्रमाणे होते. “२० वर्षांनंतर मी हा निकाल देतोय, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे की एका लोकनेत्याची अशा प्रकारे कळंबोली येथे गोळीबार करून हत्या होते. सुरुवातीला कळंबोली पोलीस, नंतर नवी मुंबई गुन्हे शाखा (Crime Branch) आणि अखेर सीबीआयकडे (CBI) हा तपास गेला. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशाने खटला या कोर्टात आला. या प्रकरणात १२७ साक्षीदार तपासले गेले. न्यायालय केवळ कायद्याच्या चौकटीत राहूनच हा निकाल देत आहे.”

पोलिसांची घोडचूक अन् तपासाचा पायाच ठिसूळ

न्यायालयाने म्हटले की, “हा खटला पूर्णपणे माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या साक्षीवर उभा आहे. जैनच्या म्हणण्यानुसार गुन्हे शाखेने त्याला ८ सप्टेंबर २००९ रोजी मुंब्रा येथून ताब्यात घेतले, मात्र त्याला अधिकृत अटक २५ सप्टेंबर दाखवली. या दरम्यान त्याला १५ दिवस बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण करण्यात आली, औषधे बंद केली आणि कबुलीजबाब (Confession) घेतला. हा पहिला जबाब कायद्याला धरून नव्हता आणि सरकारी पक्षाने (Prosecuting Agency) ही माहिती न्यायालयाला न सांगून मोठी घोडचूक केली, ज्यामुळे हा पुरावा संशयाच्या खाईत ढकलला गेला. दोन्ही जबाबात मोठी तफावत आहे.”

माफीच्या साक्षीदाराने पैशांच्या नडणुकीमुळे हा गुन्हा केल्याचा दावा केला होता, जो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायमूर्ती म्हणाले, “साक्षीदाराचे मुंबई, नवी मुंबई, मिरा-भाईंदर येथे अनेक घरे आणि मिठाईची दुकाने आहेत. त्याच्याकडे साडेचार किलो सोन्याचे भांडवल आहे. त्याचा कुठलाही उद्योग डबघाईला आलेला नव्हता. अशा परिस्थितीत त्याला केवळ ५० हजार रुपयांची गरज होती म्हणून त्याने एवढी मोठी हत्या केली, हे अजिबात पटणारे नाही. त्याला सोयीनुसार खोटं बोलण्याची सवय आहे.”

मोबाईल जप्त केले नाहीत, सीडीआर (CDR) गायब

तपासातील सर्वात मोठ्या त्रुटीवर बोट ठेवताना न्यायालय म्हणाले, “या खटल्याचा तपास करताना कुठल्याही आरोपीचा मोबाईल फोन (Mobile Phone) जप्त केलेला नाही. त्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) काढले गेले नाहीत. जप्ती पंचनाम्यात आरोपींच्या खिशात काय सापडले याची नोंद नाही. जर सीडीआर काढले असते, तर आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते का, हे स्पष्ट झाले असते. घटनाक्रमात १२ कॉल रेकॉर्डचा उल्लेख आहे, ज्यातील एक फोन पीसीओ (PCO) वरून झाला होता. पवनराजेंना आरोपींचा थेट फोन आलाच नाही, तर मग पाठलागाची आणि संवादाची ही कथा ग्राह्य कशी धरायची?”

हत्येच्या रात्रीबाबत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ‘चार कहाण्या’

न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, माफीच्या साक्षीदाराने हत्येच्या दिवशी तो मुंबईबाहेर कसा गेला, याच्या वेळोवेळी चार वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या:

पहिली कथा: बोरिवलीहून गाडी पकडून थेट श्रीनाथजी मार्गे पडेसरीला गावी गेलो.

दुसरी कथा: आधी अहमदाबादला गेलो, मग श्रीनाथजीवरून गावी गेलो.

तिसरी कथा: बोरिवलीहून अहमदाबादला मित्राकडे मांडववाड्याला गेलो.

चौथी कथा: बोरिवलीहून नाथद्वारा, तिथून कोठारावर शाळेत राहिलो, मग मांडववाड्यात मित्राकडे आणि तिथून अहमदाबादच्या ‘भाग्यदोय’ हॉटेलमध्ये राहिलो.
न्यायाधीश म्हणाले, “प्रत्येक वेळी नवीन स्टोरी सांगणाऱ्या या साक्षीदाराची साक्ष अजिबात विश्वासार्ह (Credible) मानली जाऊ शकत नाही.”

गाडीच्या रंगाचा आणि घटनास्थळाचा घोळ

“गुन्ह्यात वापरलेली गाडी जळून खाक झाली होती. तरीही जप्ती पंचनाम्यात तिचा रंग ‘हिरवा’ कसा लिहिला? कागदपत्रे पाहून रंग लिहिल्याचे अधिकारी सांगतात, मात्र मूळ पुरावा सिद्ध होत नाही. एका साक्षीदाराने गाडी छोट्या घराच्या बाजूला उभी असल्याचे सांगितले, दुसऱ्याने बंगल्याच्या बाजूला, तर पोलीस रेकॉर्डनुसार ती मोकळ्या जागेत सापडली. या सर्व लहान गोष्टींमधील तफावत सरकारी पक्षाचा हेतू संशयास्पद बनवते.”

राजकीय दरी मान्य, पण पुराव्यांचा अभाव; सर्व आरोपी मुक्त

न्यायालयाने मान्य केले की, २००२ नंतर पवनराजे निंबाळकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यात तेरणा साखर कारखाना (Sugar Factory) आणि निवडणुकीतील पराभवामुळे मोठी राजकीय दरी (Political Rivalry) निर्माण झाली होती. पूर्ववैमनस्यातून हत्येचा कट रचल्याचा सीबीआयचा आरोप होता आणि पवनराजेंनी जीवाला धोका असल्याचे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, केवळ राजकीय वैमनस्य आहे म्हणून कोणाला फासावर लटकवता येत नाही, त्यासाठी कायद्याला ठोस पुराव्यांची गरज असते.

पवनराजे निंबाळकर हत्याकांड, कोर्टात काय काय घडलं, कोर्ट काय म्हणालं? 

या खटल्याच्या सुनावणीला काही कारणास्तव उशिर झाला
२० वर्षांनंतर मी निकाल देतोय.
ही दुर्दैवी घटना आहे
एका लोकनेत्याची अशा प्रकारे हत्या होते
कळंबोली येथे गोळीबार करून हत्या झाली
सुरुवातीला जो तपास झाला तो कळंबोली पोलिसांनी केला
काही दिवसांनंतर नवी मुंबई गुन्हे शाखेकडे तपास होता
त्यानंतर सीबीआयकडे तपास गेला
दोषारोप पत्र येईपर्यंतचा तपास आहे त्यानंतर रायगड कोर्टात सुनावणी सुरू होती
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हा खटला या कोर्टात आला
या प्रकरणात अनेक सरकारी वकील बदलले
आरोपींचे जाब जबाब झाले होते
अंतिम सुनावणी वेळी आता या अधिकाऱ्यांकडे हा तपास आल्याने उशिर झाला
न्यायालय कायद्याच्या चौकटीत राहून हा निकाल दिला जातोय
१२७ साक्षीदार झाले
यातील एक आरोपी माफीचा साक्षीदार म्हणून पुढे आला आणि पुन्हा सुनावणीला सुरूवात झाली

हा खटला माफीचा साक्षीदार यांच्या साक्षीवर आधारित आहे

या साक्षीपुराव्यामध्ये ओमराजे निंबाळकर राणा देवी आणि उस्मानाबादमधील काही लोकं

साखर कारखान्यातील सहकारी आणि अन्य दोन नातेवाईक
२००२ नंतर पवनराजे आणि पद्मसिंह पाटील यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली होती
निवडणुकीत पवनराजे पराभव झाल्यानंतर राजकिय हेतूतून व पूर्ववैम्न्यसातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर येत होते.
राजकीय वैमन्यसातूनही हत्या झाल्याचे समोर आले
पवनराजे यांनी २००३ मध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र लिहिले होते
या खटल्याची पूर्ण भिस्त ही माफीच्या साक्षीदारावर उभी आहे
न्याय निवाडा करताना अनेक मागील घटनांची उदाहरणंही दिलेली आहे
माफीच्या साक्षीदाराचा पुरावा विश्वासात घेण्यापलिकडे , तपासात ज्या बाबी समोर येतील त्याचाही विचार व्हावा
हा माफीचा साक्षीदार का झाला त्याला अटक कशी झाली
कोणत्या परिस्थितीत त्याने कबुली जबाब दिले
या गोष्टीचाही विचार केला गेला
या प्रकरणात पारसमल जैन यांच्या म्हणण्यानुसार गुन्हे शाखेने ८ ९ २००९ तारखेला मुंब्रातून ताब्यात घेतले
मात्र त्याला अटक केली नाही
गुन्हे शाखेने पुढे त्याच्यावर ३ गुन्हे दाखवले
त्याची पोलिस कस्टडी घेतली
त्यात त्याला मारहाण केली औषध बंद केली
मग आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली
न्यायालयात ही त्याने हिच साक्ष दिली
१५ दिवस त्याला मारहाण केली जाते मग कबुली जबाब घेतला जातो
हे अयोग्य आहे
पोलिसांनी आम्ही ताब्यात घेतल्यानंतर मे मध्ये कबुली दिली असे म्हणतात
मात्र त्याने दिलेले कबुली आणि परत आलेली माहिती यात ३ महिन्याचा फरक आहे
हा खटल्याची भिस्त माफीच्या साक्षीदार
मात्र माफीच्या साक्षीदार याला मारहाण केल्यानंतर त्याने कबुली दिली
या प्रकरणाचा पाया ठिसूळ आहे
न्यायालयाचे मोठं निरीक्षण
पारसमल जैन आणि दुसरा आरोपी यांना कुठलाही प्रश्न न विचारता त्यांचा जबाब नोंदवला गेला
⁠हे नियमात नाही त्यामुळे संशयाचं ढग इथे पहायला मिळतात
– सीबीआय कार्यालयाला हे पत्र मिळालं मात्र ते पत्र कोणी दिलं हे सांगत नाही
– ⁠संबंधित अधिकारी यांनी ते पत्र साईडला घेतलं
– ⁠ही साधी सुधी तक्रार नव्हती एका मोठ्या गुन्ह्याचा भाग होता
– ⁠हे पत्र पाहिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने कान उभे रहायला पाहिजे होते
– ⁠काही दिवसांनी अधिकाऱ्यांना जाग आली आणि क्लार्कला ते पत्र शोधण्यास सांगितले
– ⁠हे मूळ पत्र आरोपपत्रात दाखल आहे
– ⁠मात्र हे मूळ पत्र आलं कुठून याबाबत काहीही नाही
– साक्षीदार फितुर झालेला आहे
– ⁠हे पत्र पुराव्यात पूरक म्हणून घेता येत नाही
– ⁠त्यावरील हस्ताक्षर सही बरोबर आहे
– ⁠मात्र माफीचा साक्षीदार कधी खरं बोलतो कधी खोटं बोलतो


– ⁠माफीचा साक्षीदाराचा पहिला जबाब झाला तो कायद्याला धरून नव्हता
– ⁠सरकारी पक्षाचीही जबाबदारी होती न्यायालयाला सांगितले पाहिजे होते हा जबाब महत्वाचा आहे पण ते केलं नाही
– ⁠यामुळे एक मोठी घोड चूक झालेली आहे
– ⁠यामुळे घोड चुकीमुळे हा पुरावा हुकला आणि त्याला संशयाच्या खाईत ढकलले
– कबूलीजबाबात आरोपीची व्यवस्थित माहिती घ्यायला पाहिजे
– ⁠हा जबाब घेतेवेळी प्रश्न इंग्रजीत घेतले
– ⁠मात्र जबाबदार स्वाक्षरी घेतली नाही
– ⁠जबाब झाल्यानंतर दाखले २ घ्यायचे असतात
– ⁠हे दाखले जबाबाच्या आदी दाखवलेले आहे
– ⁠हे हेच दर्शवतं अधिकाऱ्यांनी
– ⁠दुसरा कबुली जबाब देताना साक्षीदाराने पहिल्या जबाबापेक्षा अधिक माहिती दिली दोन्ही जबाबात तफावत आहेत
– ⁠बारकाईने एक एक गोष्ट पाहिली तर पुरावे दाखवण्यासाठी हे मुद्दे जोडले गेलेले दिसून येते
– ⁠माफीच्या साक्षीदाराबाबत घडलेला हा प्रकार पाहता छोट्या छोट्या गोष्टी बारकाईने पाहणं आवश्यक आहे
– माफीच्या साक्षीदाराचा मधला जो काळ आहे हा तपासणं गरजेचं आहे
– ⁠आधी कबूलीजबाब दिला नंतर तो नाकारला
– ⁠यानंतर विविध अर्ज आहेत
– ⁠यात विशेष करून माफीचा साक्षीदार सांगतोय त्याला या थोड्याच गुन्हात अडवले मारहाण केली जीवे मारण्याची धमकी दिली औषधं बंद केली कुटुंबाला मारण्याची धमकी दिली आणि जबाब नोंदवला
– ⁠घटनेच्या दिवशी तो तिथे नव्हता दुसरीकडे होता
– ⁠यासाठी नातेवाईक यांनीही तो राज्याबाहेर होता असे जबाब दिले
– ⁠एकूणच हा माफीचा साक्षीदार त्याची बदलणारी वेळोवेळीची साक्ष ही संशयास्पद आहे
– पुढे या प्रकरणातील इतर आरोपी जामिनावर बाहेर होते
– ⁠मात्र माफीचा साक्षीदार आत होता त्यावेळी त्याने लिहिलेल्या अर्जात इतर आरोपी जामीनावर आहे मात्र मी अटकेत आहे
– ⁠ माफीच्या साक्षीदार खोटं बोलत आहे वेळोवेळी साक्ष बदलतो
– ⁠साक्षीदाराचं म्हणणं आहे की त्याला आजार झाला होता पैशाची गरज होती
– ⁠मग तो इतर आरोपी्ना भेटला दुसऱ्या आरोपींनी त्याला कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है असे म्हटले
– ⁠साक्षीदाराचे मुंबई नवी मुंबई मिराभाई्दर येथे अनेक घरं आहेत दुकानं आहे
– ⁠मिठाई दागदागिने यांची दुकाने आहे
– ⁠साडेचार किलो सोन्याचं भांडवल त्यांच्याकडे आहे
– ⁠त्यांचा कुठलाही उत्योग  डबघाईला आलेला नव्हता
– ⁠अशात त्याला ५० हजार रुपयांची गरज होती म्हणून त्याने हे केलं हे न पटणारे आहे
– माफीच्या साक्षीदाराचा हा जबाब पाहता त्याच्या साक्षीने टिकून राहणं पूरक नाही
– ⁠या प्रकरणाचा तपास करताना कुठल्याही आरोपीचा मोबाईल फोन जप्त केलेले नाही
– ⁠सीडीआर काढलेले नाही अटक करते वेळी आरोपींच्या खिशात काय सापडले याची नोंद नाही
– ⁠घरझडती घेतली मात्र काही सापडले नाही
– ⁠मात्र मोबाईल जप्त करणे गरजेचे होते
– ⁠त्यातून अनेक माहिती समोर आली असती


– ⁠मात्र आदीही नाही नंतरही नाही
– ⁠मात्र त्यावेळी सीडीआर उपलब्ध नव्हते असे सरकारी पक्षाने स्पष्ट केलं मात्र
– ⁠तेव्हा नाही त्यानंतर तरी दोन्ही आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते का हे दर्शवता आलं असतं
– माफीचा साक्षीदार याने आरोपीकडून दोन वेळा दीड लाख आणि एकदा अडिच लाख घेतल्याचं सा्गितलं
– ⁠मात्र नंतर परत आपली विधानं बदलतो
– ⁠हे पैसे मातीच्या साक्षीदाराने शूटरला २० लाखाकडे अडीच लाख दिले
– ⁠मात्र त्यातही तो साक्ष बदलतो
– ⁠बिहारमधून आपण या घटनेसाठी बंदुका घेतल्या
– ⁠तिथून सिवानला जातो मग युपीला येतो
– मात्र याबाबत कसलिही नोंद किंवा तिकिट नाही
– ⁠या साक्षीदाराची साक्ष ही गृहीत धरण्याजोगी नाही
– ⁠या व्यतिरिक्त एक पुरावा आहे पेपर देण्यापूर्वी किंवा नंतर साक्षीदार हा राकेश मारिया यांना भेटला
– ⁠माफीच्या साक्षीदाराचे एकदा नाही तर दहा वेळा म्हटलं आहे की मारिया यांच्या सांगण्यावरून त्याला अटक झाली
– ⁠मग मारिया यांचा जबाब नोंदवाल का गेला नाही
– ⁠अशा परिस्थितीत हा पुरावा अभ्यासला गेला
– ⁠माफीचा साक्षीदार म्हणतो की तो आरोपी पद्मसिंह पाटील यांना मल्हार हिल येथे बंगल्यात भेटला
– ⁠मात्र पद्मसिंह पाटीलांचा बंगला तिथे नव्हताच
– ⁠पद्मसिंह पाटील यांचा फ्लॅट कुलाबा येथे होता
– साक्षीदार हा ठाण्याचा राहणारा आहे
– ⁠मोठा व्यापारी आहे
– ⁠पोलिसांचा खबरी आहे मग त्याला मुंबईची माहिती नाही हे गृहीत धरणं चुकीचं आहे
– ⁠पहिला जबाब खरा वाटतो
– ⁠दुसरा खोटा वाटतो
– ⁠दोन्ही वाचले की तफावत वाटते
– ⁠मारिया यांना भेटून स्काॅचची बाटली दिली असे म्हटले
– ⁠मात्र मारिया यांनी हे आरोप खोडून काढले
– ⁠मारिया यांना भेटल्यावर नोंद नाही
– ⁠माफीच्या साक्षीदारावर तपास अधिकारी हा गुन्हा पुढे तपासत असेल तर
– ⁠मारिया यांचा जबाब आदी घेतला नाही नंतर घेतला का ? मारिया यांना प्रश्न का विचारले नाही
– नागपूरला माफीचा साक्षीदार तीन वेळा गेला
– ⁠तिन्ही फेर्यांबाबत जबाबात वेगवेगळी माहिती दिली
– ⁠मातीच्या साक्षी दार याने पिंटू सिंग नावाच्या शूटरला हायर केले
– ⁠त्यानंतर दोघे कुठे तरी गेले या दोन्हीबाबत कुठेही मॅच होत नाही
– ⁠प्रत्येक वेळी आरोपी इंद्रप्रस्थ येथे वास्तव्यास होता
– ⁠पैसे मिळाल्यानंतर गाडी घेतली चालक ठेवला
– ⁠चालकाचा जबाब नोंदवला त्यात गाडी घेताना चालक सोबत होता
– ⁠दोघे गाडीने ठाण्याहून लातूरला गेले तिथून शिर्डीला गेले दर्शन घेतलं
– ⁠आता साक्षीदारांने दिलेला जबाब चालकाचा जबाब यात तफावत आहे
– एकूणच माफीच्या साक्षीदाराचे बदलते जबाब पाहता
– ⁠त्यानंतर आम्ही फक्त शेवटचा जबाब ग्राह्य धरावा असे जर का सरकारी पक्षाचे म्हणणे असेल तर ते योग्य ठरणार नाही
– ⁠गाडी कितीला घेतली यातही तिघांमध्ये तफावत आहे
– ⁠या सगळ्या गोष्टी पाहता माफीच्या साक्षीदाराला खोटं बोलण्याची सवय आहे किंवा सोईनुसार तो साक्ष बदलत असल्याचे निदर्शनास येते
– जी गाडी घेतली त्याच्या किंमतीतही तफावत आहे
– ⁠घटनेनंतर गाडी ही एका छोट्याशा घराच्या बाजूला लावली
– ⁠दुसरा सांगतो बंगल्याच्या बाजूला लावली
– ⁠मात्र पोलिस तपासानुसार गाडी मोकळ्या जागेत सापडली
– ⁠गावाकडे दोन साक्षीदार जे तपासले तेही सांग त्यात गाडी मोकळ्या जागेत सापडली
– ⁠गाडीचा रंग एकाही साक्षीदाराला आठवत नाही
– ⁠गाडी जळून खाक झाली होती
– ⁠जप्ती पंचनाम्यात गाडी हिरव्या रंगाची म्हटले आहे
– ⁠गाडी जळून खाक होती तर रंग कसा तपासला
– ⁠तर गाडीचे कागदपत्र पाहून ते रंग लिहिले
– ⁠गाडीचे आदीचे फोटो पाहिले मात्र ते सिद्ध झालेले नाही
– ⁠दोन्ही पक्षाने त्याबाबत काहीही न दिल्याने न्यायालयाने त्यावर भाष्य करणं टाळलं
– या प्रकरणात सीडीआर कुठल्याच आरोपींचे काढले नाही
– ⁠जर का हे काढले असते तर ठोस पुरावे मिळाले असते
– ⁠या प्रकरणात १२ काॅल रेकॉर्ड केले आहेत यातील एक फोन आरोपीने पीसीओने केले होते
– ⁠पवनराजेंना फोनआलेला नाही मग साक्षीदार यांचा जबाब ग्राह्य कसा धरायचा
– मूळ घटनेत आरोपींनी पवनराजेंच्या गाडीचा पाठलाग केला
– ⁠गाडी निघाली पाठलाग झाला
– ⁠पुढे जाऊन गाडी थांबवली
– ⁠माफीचा साक्षीदार म्हणतो आम्ही इशाऱ्यांना गाडी बाजूला घेण्यास सांगतो
– ⁠गाडी अशी बाजूला घेतली की समोर स्कोडा कार होती
– ⁠मग आम्ही चालकाला विचारलं राजेसाहेब कुठे आहेत
– ⁠त्याने झोपलेल्या पवनराजेंना उठवलं मग या दोघांनी गोळ्या झाडल्या
– ⁠मग घटनास्थळाहून चौघे पुढे गेले
– ⁠घटनास्थळी तपासात स्कोडा कार एक्सप्रेस हायवेच्या उजव्याबादूवा खडीला लागून होती
– ⁠स्पाॅट पंचनान्यात कुठेही उतार नाही
– ⁠साक्षीदार तपासले त्यांना सूचक वक्तव्य विचारला नाहीत
– घटनास्थळी प्रात्यक्षिक केलेले नाही
– ⁠रस्ता कुठेही स्लोप नव्हता
– ⁠या पुराव्यांमध्ये न्यायालय ग्राह्य धरू शकत नाही
– ⁠उजव्या बाजूवर गाडी ढिगार्यावर चढत असेल तर ते तसे हेही स्पष्ट होत नाही
– ⁠घटनेनंतर घटनास्थळावरील साक्षीदार यांचे कंळबोली पोलिसांनी जबाब घेतले
– ⁠या दोन्ही साक्षीदार यांना खोटं बोलण्याचे कोणतेही कारण दिसून येत नाही
– ⁠कळंबोली पोलिस ठाणे परिसरात बेवारस दुचाकी मिळून येते त्याची माहिती पोलिसांना एक देतो त्याची नोंद पोलिस घेतात
– ⁠ही गाडी पंजाबची आहे हे वाहन तिथे कसे आले या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध हे तपासले गेलं नाही
– माफीच्या साक्षीदाराने घटनेनंतर ग्रॅन्टरोडहून आरोपीला फोन केले
– ⁠मात्र याची नोंदही कुठेही नाही
– ⁠हत्येच्या दिवशी मुंबईबाहेर आरोपी कसे गेले याबाबत वेगवेगळ्या चार कथा सांगितल्या आहेत
– ⁠कधी बोरिवलीहून गाडी पकडली सांगतो
– ⁠श्रीनाथजी मार्गे पडेसरीला गेल्याचे पहिल्या जबाबात म्हटले
– ⁠दुसऱ्या जबाबात अहमदाबाद मग श्रीनाथने मग पडेसरीला गावी गेल्याचे सांगतो
– ⁠तिसऱ्या जबाबात कोर्टापुढे सुरवातीला बोरिवलीला गेले मग अहमदाबादची गाडी घेतली
– ⁠तिथून मांडववाड्याला मित्राकडे गेला
– ⁠मग मित्रांसोबत पडासरीला गेला
– ⁠चौथ्या जबाबात बोरिवली नाथद्वारा येथे गेला तिथून कोठारावर शाळेत राहिला मग मांडववाड्यात गेला मग अहमदाबादला गेला तिथे भाग्यदोयला राहिला त्याची नोंद त्याने दाखवली
– ⁠मग मुंबईला आला
– ⁠प्रत्येक वेळी  वेगवेगळी स्टोरी
पवनराजे हत्याकांड प्रकरणात माफीच्या साक्षीदाराची साक्षचं विश्वासार्ह नाही – न्यायमूर्ती
या खटल्यात माफीच्या साक्षीदाराच्या आधारावर शिक्षा देता येत नाही
हा धागा सरकारी पक्षासाठी महत्वाचा होता मात्र वारंवार जबाब बदलल्याने माफीच्या साक्षीदाराचा जबाब ग्राह्य धरता येत नाही
संशयाचा फायदा घेऊन सर्व आरोपी्ना न्यायालय मुक्त करत आहे

मुक्त झालेल्या आरोपींची यादी

१. डॉ. पद्मसिंह पाटील (८६ वर्षे)
२. सतीश मंदाडे
३. मोहन शुक्ला
४. शशिकांत कुलकर्णी
५. कैलास यादव
६. दिनेश तिवारी
७. पिंटू सिंग (मुख्य शूटर)
८. छोटे पांडे

नेमकं प्रकरण काय होतं?

३ जून २००६ रोजी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत एक्सप्रेस हायवेवर पवनराजे निंबाळकर यांची कार अडवून अंदाधुंद गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात त्यांचा चालक समद काझी याचाही मृत्यू झाला होता. सीबीआयने या प्रकरणात २५ लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा आरोप माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ठेवला होता. मात्र, तब्बल २० वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर आज सीबीआय कोर्टाने सर्व ८ आरोपींची निर्दोष सुटका केल्याने या प्रकरणाला अत्यंत अनपेक्षित कलाटणी मिळाली आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Omraje Nimbalkar: पवनराजे निंबाळकर खटल्याचा निकाल विरोधात जाताच ओमराजेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘शिंदे गटात जायचं की नाही, अजून ठरवलं नाही’

Gold Price Today : सोन्याचे दर गडगडले, चांदीचीही चमक फिकी, खरेदीपूर्वी जाणून घ्या दर पटापट…

अखेर बंडखोर खासदारांचा एकत्रित फोटो समोर, पंचतारांकित हॉटेलात… तो बडा नेता कोण? सस्पेन्स वाढला

सरकारचा मोठा निर्णय! शेतकरी विधवांच्या बचत गटांना शासकीय पडीक जमीन देणार, महत्त्वाचा निर्णय वाचला का?

खूप मोठ्या यातना भोगल्या संघर्ष केला.. कोर्टात पोहोचताच ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया, थेट..

आता नुसता धो धो पाऊस बरसणार, या तारखेनंतर राज्यभरात काळे ढग; हवामान विभागाचा नवा अंदाज आला !