टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Team India T20I Squads : BCCI कडून आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; श्रेयस अय्यर कर्णधार, तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी

Team India squads for Ireland and England T20Is Tour : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासह जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारतीय टी-20 संघाची घोषणा केली आहे.

Team India squads for Ireland and England T20Is Tour : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासह जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारतीय टी-20 संघाची घोषणा केली आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या निवड समितीच्या बैठकीत काही अत्यंत धाडसी आणि आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले आहेत. टी-20 विश्वचषक 2026 चा विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला धक्का देत निवड समितीने संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे सोपवली आहे.

 

श्रेयस अय्यरचे ‘कॅप्टन’ म्हणून धमाकेदार पुनरागमन

डिसेंबर 2023 पासून भारतीय टी-20 संघातून बाहेर असलेल्या श्रेयस अय्यरने थेट कर्णधार म्हणूनच संघात पुनरागमन केले आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यासारखे पर्याय असतानाही निवड समितीने अय्यरच्या नेतृत्व कौशल्यावार विश्वास दाखवला आहे. भारतीय टी-20 संघात सध्या अनेक आक्रमक सलामीवीर आणि फिनिशर्स आहेत. मात्र, मधल्या फळीत डाव सावरणारा आणि दबावाच्या परिस्थितीत संथ न खेळता धावांची गती कायम ठेवणारा खेळाडू हवा होता, ही उणीव श्रेयस अय्यर भरून काढेल. आयपीएलमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचा आणि नेतृत्वाचा फायदा भारतीय संघाला नक्कीच होईल. दुसरीकडे, भारताला नुकताच 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. याच कारणास्तव त्याला केवळ कर्णधारपदावरूनच हटवण्यात आलेले नाही.

 

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची संघात निवड

या निवडीतील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय म्हणजे 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएल 2026 च्या हंगामात आपल्या फलंदाजीने संपूर्ण क्रिकेट जगताला थक्क करणाऱ्या वैभवला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले आहे. सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये 16 सामन्यांमध्ये सर्वाधिक 776 धावा करून ऑरेंज कॅप जिंकली. त्याने एकाच हंगामात सर्वाधिक 72 षटकार मारले आणि त्याचा स्ट्राइक रेट 237.30 होता. वैभवच्या या तुफानी कामगिरीमुळे निवड समितीने त्याला थेट आंतरराष्ट्रीय संघात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ (INDIA SQUAD FOR IRELAND SERIES)

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ (INDIA SQUAD FOR England SERIES)

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.

आशियाई क्रीडा स्पर्धासाठी भारतीय टी-20 संघ (India Squad for the Asian Games)

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी.

टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक (Team India All Schedule)

भारताचा आयर्लंड दौरा

26 जून : पहिला टी-20 सामना (बेलफास्ट)
28 जून: दुसरा टी-20 सामना (बेलफास्ट)

भारताचा इंग्लंड दौरा  

01 जुलै: पहिला टी-20 सामना (चेस्टर-ली-स्ट्रीट)
04 जुलै: दुसरा टी-20 सामना (मँचेस्टर)
07 जुलै: तिसरा टी-20 सामना (नॉटिंगहॅम)
09 जुलै: चौथा टी-20 सामना (ब्रिस्टल)
11 जुलै: पाचवा टी-20 सामना (साऊदॅम्पटन)

हे ही वाचा –

Vaibhav Sooryavanshi : हात जोडतो, लांब राहा…; श्रीलंकेत पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीचा पारा चढला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral

वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून ‘क्लासिक’ षटकार, पाहा Video

वैभव सूर्यवंशी याच्यासोबत श्रीलंकेच्या खेळाडूने केले नीच कृत्य, धक्कादायक प्रकार, थेट घरी जा..

Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक

Vaibhav Sooryavanshi : श्रीलंकेविरुद्ध जे जमलं नाही ते वैभवने अफगाणिस्तान विरुद्ध करुन दाखवलं, मोठी इनिंग खेळू शकला नाही, पण..

IND vs AFG : केएल-शुबमनचं कडक शतक, टीम इंडियाच्या पहिल्या दिवशी अफगाणिस्तान विरुद्ध 368 धावा