टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

डॉ. सत्यशीला घोंगडे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

On: May 6, 2026 11:16 AM
Follow Us:

सांगोला: शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागातील संशोधक आणि सांगोल्यातील डॉ. सत्यशीला दत्तात्रय घोंगडे यांनी सादर केलेल्या ‘मायक्रोवेव्ह अनुप्रयोगांसाठी BaFe₁₂O₁₉–पॉलीपायरोल संमिश्र पदार्थावर आयनीकरण किरणोत्सर्गाचा परिणाम’ या संशोधन प्रबंधाला पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे. त्यांना भौतिकशास्त्र अधिविभागातील प्रा. आर.जी. सोनकवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यासाठी मुंबई विद्यापीठातील डॉ. प्रदीप सरवदे यांनी बाह्य परीक्षक म्हणून उपस्थित राहून संशोधकाचे मूल्यमापन केले. प्रा. केशव राजपुरे, डॉ. निलेश तलवार, डॉ. विजय कुंभार, डॉ. मकसूद वाईकर, डॉ. सत्यजीत पाटील व डॉ. शितल शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.

     डॉ. सत्यशीला घोंगडे या मूळच्या सांगोल्याच्या रहिवाशी असून त्यांचे माध्यमिक शिक्षण सांगोला विद्यामंदिर येथे झाले असून महाविद्यालयीन शिक्षण सांगोला कॉलेज सांगोला येथे झाले आहे. पदवी तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झाले असून या दरम्यान त्यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण करून डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. त्यांचे वडील दत्तात्रय (पिंटू) घोंगडे खाजगी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करत मुलींचे शिक्षण पूर्ण केल्याबद्दल सत्यशीला घोंगडे व त्यांच्या परिवाराचे कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा