टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

कमलापूरजवळ भीषण अपघात; एसटी चालकासह ७ प्रवासी जखमी

On: May 6, 2026 10:40 AM
Follow Us:

सांगोला (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वर कमलापूर गावाजवळील पुलावर शनिवारी (दि. 2 मे) दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एसटी बस चालकासह सात प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवलेल्या एसटी बसने पाठीमागून पाणी टँकरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सिध्देश्वर भोसले (रा. वाढेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एसटी बसचालक जगदीश पाटील (नेमणूक – मालवण आगार) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवण आगाराची एसटी बस सांगली–सोलापूर मार्गावरून प्रवास करत होती. सांगोला तालुक्यातील कमलापूर गावाजवळील पुलावर पाण्याच्या टँकरला बस चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगात येत जोरदार धडक दिली. या धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले, तर टँकरचेही नुकसान झाले.

या अपघातात बस चालक जगदीश पाटील स्वतः गंभीर जखमी झाला असून बसमधील प्रवासी सुहाना शेख (रा. सांगली), लहु मोहीते (रा. तिप्पेहाळ्ळी), नजर पठाण (रा. सलगरे), प्रकाश कदम व मिलींद कदम (रा. निपाणी) तसेच गुलशान शेख (रा. सांगली) हे जखमी झाले आहेत.

हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे अंदाजे 10 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, जखमींना तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ बोराटे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा