टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला येथे कंटेनरला लागली आग ; कंटेनर मधील साहित्य जळून खाक

Follow Us:

सांगोला – फळे भाजीपाल्यासाठी लागणारे रिकामे कॅरेट कंटेनर मध्ये भरून व्यापाऱ्याकडे खाली करण्यासाठी जाताना चालकाला रस्त्यावरील विजेच्या तारांचा अंदाज न आल्याने तारा तुटून ठिणगी पडून कंटेनरला लागलेल्या भीषण आगीत कंटेनर मधील सुमारे २ लाख रुपयाचे कॅरेट जळाले तर आगीत कंटेनरचेही मोठे नुकसान झाले. सुदैवाने प्रसंगावधान राखून चालकाने कंटेनर मधून उडी घेतल्याने तो बालंबाल बचावला. दरम्यान सांगोला नगरपालिकेच्या अग्नीशमन बंबाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना काल सोमवार २७ रोजी रात्री ८ च्या सुमारास सांगोला – चिंचोली रोड बायपास नजीक घडली.

मिरज येथून एम एच -१२ पी क्यू -९९५८ या कंटेनरमध्ये ९ किलो वजनाचे १ हजार ८५४ तर २० किलो वजनाचे ७३७ रिकामे कॅरेट भरून सांगली – सोलापूर हायवेने सोमवारी रात्री ८ च्या सुमारास सांगोला- चिंचोली बायपास येथील परप्रांतीय डाळिंब व्यापाऱ्यांकडे कॅरेट पोहच करण्यासाठी निघाला होता‌. वाटेत रस्त्याच्या वरून विजेच्या तारांचा चालकाला अंदाज न आल्याने तारा कंटेनर समवेत पुढे खेचून तुटल्याने ठिणगी उडून कंटेनरने पेट घेतला. बघता बघता आगीने उग्र रूप धारण केल्याने परिसरात आगीचे व धुराचे लोट पसरल्याने गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी सांगोला नगरपालिकेच्या अग्नीशमन बंबास पाचारण केले.

अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. कर्मचाऱ्यांनी धाडसाने आगीवर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले तर परप्रांतीय व्यापारी, कामगार व स्थानिक नागरिकांच्या मदतीने कंटेनर मधील रिकामे कॅरेट बाहेर काढून मोठे नुकसान टळले. दरम्यान सदर घटनेत महावितरणच्या तारा तुटल्याने काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने खंडित वीजपुरवठा सुरळीत केल्याने स्थानिक नागरिकांनी जे समाधान व्यक्त केले.

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now