फॅबटेक फार्मसीच्या २१ विद्यार्थ्यांची अ‍ॅजिओ फार्मास्युटिकल्स मध्ये निवड

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला: प्रतिनिधी

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी (ता. सांगोला) महाविद्यालयातील २१ विद्यार्थ्यांची पुणे येथील अ‍ॅजिओ फार्मास्युटिकल्स मध्ये येथे ऑन द जॉब ट्रेनी म्हणून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे  ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. चेतन पतंगे यांनी दिली.

फॅबटेक महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. ते अत्यंत कौतुकास्पद आहेत. केवळ नोकरीच्या संधी मिळवून देण्यापुरतेच त्यांचे कार्य मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांना उद्योग जगतातील स्पर्धेसाठी सज्ज करणे, संवाद कौशल्य, आत्मविश्वास व व्यावसायिकता विकसित करणे यासाठी ते सतत मार्गदर्शन करत असतात. उद्योग क्षेत्राशी भक्कम संपर्क राखून, विभागाने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

फार्मसीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेले वैष्णवी दांडगे, शुभांगी पुंडे, तेजल बनसोडे, दिव्या भुईटे, प्रविण दानवे, नेहा मोरे, गौरी बाबर, नेहा जाधव, जोया बारस्कर, चैतन्या कुटे, जयश्री पैलवान, अमृता डिसले, मयुरी ताटे, ॠतिका वगरे, सुहास जाधव, अंकिता बाबर, हर्षदा गायकवाड, ओंकार सपताळ, हर्षदा नरळे, सायली चव्हाण, शहिसता आतार आदी विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे.

सांगोला फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये पदवी पूर्ण होण्याआधीच नोकरी मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे व उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. हि निवड प्रक्रियेच्या यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा. श्रीनिवास माने यांचे मार्गदर्शन लाभले.

अ‍ॅजिओ फार्मास्युटिकल्स मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. संजय बाइस आदींसह फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon