बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान, दीपिका पदुकोण यांचा पठाण हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन ठिकठिकाणी केले जात आहे. या चित्रपटातील एका गाण्यामुळे पठाण हा सिनेमा वादात अडकला आहे. नुकतेच बेशरम रंग हे गाणे रिलीज करण्यात आले. या गाण्यांमध्ये दीपिकाचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे तिचा हा लुक चाहत्यांना आवडला आहे.
मात्र या गाण्यातील तिच्या बिकिनीमुळे वाद निर्माण होत आहे. या गाण्यात तिने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान याबाबत शाहरुखने ट्विट केले आहे की, आता माझी टीम मला कामावर बोलावत आहे. तुमच्या सर्वांशी दुसऱ्या दिवशी बोलेल. ज्यांचाशी संवाद राहिला आहे त्यांनी कृपया वाईट वाटू नका. अभी पिक्चर बाकी है…. तुमचे प्रेम आणि तुमचा वेळ याबदद्ल धन्यवाद. भेटू या लवकरच थिएटरमध्ये.