‘द काश्मीर फाईल्स’ नंतर भारतीय प्रेक्षक आणखी एका शोकांतिकेची आणखी एक दु:खद कथा पाहतील, असे दिसते. यावेळी, भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वात मोठ्या निर्मात्यांपैकी एक असलेले विपुल शाह ही कथा मांडणार आहेत. वास्तवातील काही घटनांवर आधारित ही सिनेमाची कथा आहे. The Kerala Story या सिनेमात भारताच्या केरळ राज्यातून गायब झालेल्या महिलांचे अनुभव मांडण्यात आले आहेत.
सिनेमाच्या टीझरमध्ये केरळमधील महिलांची कथा समोर आली आहे ज्यांची इसिस आणि इतर इस्लामिक संघटनांनी या भागातून तस्करी केली होती. सिनेमात या कथानकामागील सत्य आणि महिलांच्या वेदना दाखवल्या जाणार आहेत.
सिनेमात शालिनी उन्नीकृष्णन या महिलेची भूमिका मांडण्यात आलेली आहे. जिला नर्स व्हायचं होतं. मात्र, तिचं अपहरण करण्यात आलं होतं. तिचा धर्म बदलण्यात आला आणि आता तिला इसिसची दहशतवादी म्हणून अफगाणिस्तान जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.