चीनमध्ये कोरोनासंदर्भात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलत सहा देशांमधून येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. नवीन वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
केंद्रीयमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले की, १ जानेवारीपासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया,सिंगापूर आणि थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यांना प्रवासापूर्वी हवाई सुविधा पोर्टलवर त्यांचा अहवाल अपलोड करावा लागेल. याआधी अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी कोविड संबंधित तपासणी अनिवार्य करण्याची घोषणा केली होती. चीनमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गाच्या घटना पाहता, देशात व्हायरसशी संबंधित कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये कोरोनाचे तांडव, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Leave a comment