Sunday, October 6, 2024
Homeindia worldक्रिकेट असो की अन्य काही, प्रत्येक युद्धात भारतच किंग

क्रिकेट असो की अन्य काही, प्रत्येक युद्धात भारतच किंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीनिमित्त जम्मू काश्मीरमधील कारगिलला पोहचले आहेत. यावेळी मोदींनी जवानांसोबत दिवाळीचं सेलिब्रेट केलं आहे.  मोदींनी कारगिलमध्ये म्हटले की, वर्षानुवर्षे माझ्यासाठी तुम्ही सर्व माझे कुटुंबीय आहेत. माझ्या दिवाळीचा गोडवा तुमच्यामध्ये वाढतो, माझ्या दीपावलीचा प्रकाश तुमच्यामध्ये आहे जे पुढील दिवाळीपर्यंत माझे स्थान वाढवते.
मोदी म्हणाले की, पाकिस्तानसोबतचे एकही युद्ध असे झाले नाही जिथे कारगिलने विजयाचा झेंडा फडकवला नाही. दिवाळी म्हणजे दहशतवाद संपवणारा उत्सव. कारगिलनेही तेच केले. एखाद राष्ट्र अमर असते जेव्हा तिची मुलं, तिचे शूर पुत्र आणि मुलांचा त्यांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असतो.
मोदींनी याआधी अयोध्येतील दीपोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांनी रामजन्मभूमी मंदिरात प्रार्थना केली. तसेच दीपोत्सव कार्यक्रमात मोदी सहभागी झाले होते. मोदींनी देशवासियांना दिवाळीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments