अक्कलकोट येथे दर्शनासाठी जात असलेल्या प्रवासी वाहतूक गाडीचा व उसाच्या ट्रॅक्टरचा अपघात झाला.यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीतील दोन भाविक ठार झाले आहेत. तर 15 भाविक जखमी झाले आहेत. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.ही घटना कर्नाटकातील धुळखेड सीमेवर आज पहाटे घडली आहे. जखमींना सोलापुरातील शासकीत रुग्णालयात दाखल केले असून त्याच्या वरती उपचार सुरू आहेत.