अभिनेत्री रविना टंडन एका वादात सापडली आहे. याचे कारण म्हणजे रविनाचा मध्य प्रदेशमधील सातपुडा टायगर रिजर्वच्या सफरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रविनानेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. ज्यामुळे आता ती वादात सापडली आहे.
या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की, या सफरीदरम्यान रविनाची जीप वाघाच्या खूप जवळ आहे. कॅमेरा सटर्सचा आवाज देखील व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. व्हिडीओमध्ये दोन-तीन वाघ दिसत आहेत.
हा व्हिडीओ रविनाने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता, जो पाहून फॉरेस्ट रिजर्व अथॉरिटीजने विरोध केला आहे. टायगर रिजर्व मॅनेजमेंटने जीपच्या ड्रायव्हर, ड्यूटीवर असलेले अधिकाऱ्यांना नोटिस पाठवली आहे. त्यांचाही तपास करण्यात येणार आहे.