टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधील अनेक सामने रोमांचक झाले. अनेक सामने रंगतदार झाले. अटीतटीच्या लढती पहावयास मिळाल्या. या वर्ल्ड कपमध्ये सिक्सर किंग कोण, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. या स्पर्धेत सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या खेळाडूंची यादी आयसीसीने जाहीर केली आहे.
या यादीत झिम्बाब्वेचा सिकंदर रजा प्रथम क्रमांकावर आहे. त्याने आठ सामन्यांमध्ये 11 षटकार खेचले. या यादीत इंग्लंडचा हेल्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने सहा सामन्यात दहा सिक्स ठोकले.
श्रीलंकेचा कुशल मेंडीस तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आठ सामन्यात दहा षटकार खेचले. ऑस्ट्रेलियाचा स्टोनिस हा चौथ्या स्थानावर असून त्याने चार सामन्यात नऊ षटकार ठोकले. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने सहा सामन्यांमध्ये नऊ षटकार खेचले.