Saturday, September 21, 2024
Hometop newsआपने मनपा निवडणुकीच्या तिकिटासाठी उमेदवाराला मागितले ८० लाख रुपये

आपने मनपा निवडणुकीच्या तिकिटासाठी उमेदवाराला मागितले ८० लाख रुपये

भाजपने दिल्ली महानगरपालिका निवडणुकीआधी एक स्टींग व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये आपवर तिकीट विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा हे वारंवार आपच्या नेत्यांचे स्टिंग समोर आणत आहेत.

जे रोहिणीच्या वॉर्ड ५५ डीशी संबंधित आहेत. पात्रा यांनी व्हिडीओ जारी करून बिंदू यांच्याकडून तिकीटासाठी ८० लाख मागण्यात आल्याचे म्हटले आहे. बिंदू यांनी सर्व पैसे एकत्र देण्यास सांगण्यात आलं. पण त्यांनी पहिला २१ लाख नंतर ४० लाख आणि नंतर २० लाख देईन असं म्हटलं आहे. परंतु पूर्ण पैसे द्यायचे आहेत, असे सांगून त्यांना ते नाकारण्यात आले.
याआधी आठ नेत्यांनी पूर्ण पैसे दिले आहेत. आपच्या कार्यकर्त्या शोभा खारी यांनी आपकडे तिकीट मागितले. आमदार अखिलेश त्रिपाठी यांनी तिकीट देण्यासाठी ९० लाख मागितल्याचा आरोप शोभा यांनी केला आहे. तर ३५ लाख रुपये त्रिपाठी आणि २० लाख रुपये वजीपूरच्या राजेश गुप्ता यांना दिले होते.
३५ लाख रुपये तिकीट मिळाल्यानंतर द्यायचे होते. परंतु लिस्ट जारी झाल्यानंतरही शोभा यांचे नाव आले नसल्याचे म्हटले आहे. या स्टिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments