Weight Loss: पनीर किंवा मशरूम वजन कमी करण्यासाठी काय खावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

वजन कमी करण्यासाठी आहारात काही पोषक तत्वांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आहारात प्रोटीन असणे आवश्यक आहे, जे कॅलरीजचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. पनीर आणि मशरूम यापैकी कोणते अधिक फायदेशीर आहे ते तज्ञांकडून जाणून घेऊया.

बदलत्या जीवनशैलीमुळे व अनहेल्दी आहाराचे अधिकतर सेवनाने अनेकांचे वजन अधिक प्रमाणात वाढले आहेत. अशातच वजन हे झपाट्याने वाढत असते आणि वाढवता देखील येते. पण प्रश्न येतो ते म्हणजे वजन कमी करण्याचा, कारण वजन लवकर कमी करणे सोपे काम नाही. यासाठी खूप मेहनत करावी लागते. पण व्यायामासोबतच तुम्हाला तुमच्या आहाराकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने युक्त आहार घ्यावा. आजकाल डाएटिंगचा ट्रेंड जास्त दिसतोय. तो म्हणजे अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेटलॉस किटसह सर्व प्रकारच्या आहारांचे पालन करतात. वजन कमी करण्यासाठी आहार तज्ञ मशरूम आणि पनीर खाण्याची शिफारस करतात, जे प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. पण या दोघांपैकी कोणता पदार्थ अधिक फायदेशीर आहे? याबद्दल जाणून घेऊया पोषणतज्ञ नमामी अग्रवाल यांच्याकडून.

पनीर हा एक आरोग्यदायी पर्याय

पोषणतज्ञ नमामी अग्रवाल सांगतात की, पनीरमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, जे स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर पनीरच्या सेवनाने त्यातील प्रथिनांमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. पनीरमध्ये कॅल्शियम देखील भरपूर असते, जे हाडांसाठी चांगले असते. मात्र, पनीरमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. पण आजकाल लो फॅट पनीरचा पर्यायही बाजारात उपलब्ध आहे. जे वजन कमी करणाऱ्यांसाठी त्याच्या आहारात समावेश करण्यासाठी पर्याय म्हणूनआहे

मशरूममध्ये कमी कॅलरीचे प्रमाण

मशरूममध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. म्हणून तज्ञ वजन कमी करण्यासाठी ते खाण्याची शिफारस करतात. 100 ग्रॅम मशरूममध्ये फक्त 22 कॅलरीज असतात. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, जे योग्य पचन राखण्यास आणि दीर्घकाळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करते. याशिवाय तुम्ही मशरूमचे सेवन केल्यानंर त्यातील व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखे पोषक घटक शरीरासाठी व वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

पनीर आणि मशरूम पैकी कोणते योग्य

तज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी आणि जास्त फायबर असलेले पर्याय शोधत असाल तर मशरूम अधिक चांगले आहे. त्याच वेळी पनीरमध्ये अधिक कॅलरी आणि फॅट असते. पण जर तुम्ही लो फॅट पनीर खात असाल तर तोही एक चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तसेच प्रोटीनची कमतरता पूर्ण करायची असेल तर तुम्ही लो फॅट पनीर खाऊ शकता.

मात्र तज्ञांचे म्हणणे आहे की तुमच्या आहारात मशरूमचा समावेश करून तुम्ही लवकर वजन कमी करू शकता. मशरूमच्या सेवनाने शरीराला जवळजवळ सर्व आवश्यक जीवनसत्त्वे देखील मिळतील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Read Also

Chhaava First Weekend Collection: बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चं तुफान; 72 तासांत 10 फिल्म्सचे रेकॉर्ड्स चक्काचूर

Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगरची चर्चा, डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये

अमेरिकेतून आणखी ११२ अनिवासी भारतीयांना घेऊन तिसरे विमान दाखल

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon