दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला फरफटत भारतात आणलं, NIA चौकशी करणार, तर अमेरिकन कोर्टाने अनुमती दिलेल्या कलमांनुसारच तहव्वूर राणावर खटला चालण्याची शक्यता
-
एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात मिळाला केवळ 56 टक्के पगार, निधी कमतरतेमुळे पगार कमी झाल्याची माहिती, कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं? इंटकच्या श्रीरंग बरगेंचा सवाल
-
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा 35 कोटी 48 लाख रुपयांचा निधी वापरलाच नसल्याचं कागदपत्रांवरुन स्पष्ट, रुग्णालयांसाठीच्या नियमांचं पालन नाही, चौकशी अहवालात ठपका
-
एफबी म्हणजे ‘फुकटचा बाबूराव’: फेसबुक लाइव्ह करून फेक नरेटीव्ह पसरवले, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
-
तनिषा भिसेंच्या कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची 5 लाखांची आर्थिक मदत नाकारली, दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, भिसे कुटुंबीयांची मागणी
-
धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर, करुणा शर्मांचा हल्लाबोल, संघर्षाच्या काळात मालमत्ता, मंगळसूत्र गहाण टाकून मुंडेसाठी पैसे उभे केल्याचा दावा
-
करुणा शर्मांसह मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, माझगाव कोर्टाचा आदेश, दोन लाखांची पोटगी देण्यावर शिक्कामोर्तब
-
मुंबई गोवा महामार्ग 12 एप्रिल रोजी अवजड वाहनांसाठी बंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या रायगड दौऱ्यामुळे प्रशासनाची खबरदारी
-
सुनील तटकरेंचं जेवणाचं आमंत्रण अमित शाहांनी स्वीकारलं, पालकमंत्रिपदाबाबत चर्चेची शक्यता
-
महाराष्ट्र तापला, बहुतांश ठिकाणी तापमान 40 अंशाच्या वर, नंदुरबारात सर्वाधिक 45.3 अंश तापमानाची नोंद, तर विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळीचा इशारा
-
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, दोन हजार रुपयांनी दर वधारले, जीएसटीसह सोन्याचा प्रतितोळा भाव 94 हजारांवर
-
2028 च्या ऑलिंपिकमध्ये 6-6 पुरुष-महिला क्रिकेट संघ: सामने टी-20 स्वरूपात खेळवले जातील, प्रत्येक संघात 15-15 खेळाडू असतील
-
राजस्थान रॉयल्सला दुसऱ्यांदा स्लो ओव्हरसाठी दंड: कर्णधार संजू सॅमसनला 24 लाख रुपयांचा दंड, प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट प्लेअरलाही दंड
-
CSKच्या कर्णधारपदाची धुरा पुन्हा धोनीकडे: दुखापतीमुळे गायकवाड IPLमधून बाहेर; कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली माहिती
-
LIVE- IPL मध्ये RCB vs DC: बंगळुरूने 4 विकेट गमावल्या, विपराज निगमने विराट कोहलीला झेलबाद केले
महत्वाच्या बातम्या: