Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका लागला आहे. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर व्हावं लागलं आहे.
आयपीएलच्या 18 व्या मोसमात 9 एप्रिलपर्यंत एकूण 23 सामने खेळवण्यात आले आहेत. या हंगामातील 24 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. त्याआधी भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्स टीमच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सीएसकेचा कर्णधार दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी उर्वरित सामन्यात चेन्नईच्या नेतृ्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. याबाबतची माहिती सीएसके हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली आहे.
कर्णधार ऋतुराज गायकवाड का गेला बाहेर?
सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी केकेआर विरुद्धच्या सामन्यापूर्वी 10 एप्रिल रोजी ही माहिती दिली. ऋतुराज गायकवाडच्या कोपरात फ्रॅक्चर झाले आहे आणि त्यामुळे तो या स्पर्धेत खेळू शकणार नाही. 2024 मध्ये ऋतुराज गायकवाड यांना सीएसके संघाचा कर्णधार बनवण्यात आले आणि या हंगामातील पहिल्या 5 सामन्यांमध्येच त्याने संघाचे नेतृत्व केले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघ : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर) (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.