टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Donald Trump : अमेरिका- इराण शांतता करारावर सस्पेन्स कायम, डोनाल्ड ट्रम्प यांचा होर्मुझवरील दावा इराणनं खोटा ठरवला, युद्ध थांबणार की भडकणार?

On: May 30, 2026 11:26 AM
Follow Us:

US Iran War : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत केलेला दावा इराणनं फेटाळला आहे. यामुळं युद्ध थांबणार की पुन्हा भडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याकडून इराणसोबत केल्या जाणाऱ्या संभाव्य करारासंदर्भात दावा करताच  इराणच्या संरक्षण दलाशी संबंधित मीडियानं ट्रम्प यांचे दावे फेटाळले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलेला की इराणवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाज सोडताना कोणतंही शुल्क न आकारण्याची वेळ आली आहे. मात्र, इराणनं डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळला  आहे. ट्रम्प यांचा दावे वस्तूस्थिती आणि असत्याचं मिश्रण आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात ज्या करारावर चर्चा सुरु आहे, त्यात याचा उल्लेख नसल्याचं इराणनं म्हटलं आहे.

ट्रम्प यांचा काल्पनिक विजय दाखवण्याचा प्रयत्न

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून या संघर्षात काल्पनिक विजय दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचं इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित फर्स न्यूजनं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.  रिपोर्टनुसार कमिटमेंट फॉर कमिटमेंट नावानं प्रस्तावित करार  इराणमध्ये मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.  मात्र, त्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पश्चिम आशियातील संकटासंदर्भात एका बैठकीत सहभागी होण्यापूर्वी एक दावा केला होता. त्यात ते म्हणाले होते की होर्मुझच्या सामुद्रधुनीतील निर्बंध जवळपास संपले आहेत, सागरी वाहतूक सामान्य झाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जागतिक इंधन वाहतुकीच्या 20 टक्के वाहतूक या भागातून होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्र्थ सोशलवर एक पोस्ट करत म्हटलं होतं की इराण तातडीनं स्फोटकांच्या सुरुंगांना निष्क्रिय करेल. आमच्या नौदलाची नाकेबंदी हटवली जात असून सामुद्रधुनीत अडकेलली जहाजं परत जाण्याची प्रक्रिया सुरु करु शकतात. पुढील सूचना येईपर्यंत आर्थिक व्यवहार होणार नाहीत, इतर काही मुद्यांवर सहमती झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं.

इराणनं ट्रम्प यांचा दावा फेटाळला

इराणच्या माध्यमांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीला पुन्हा खुली करण्याची प्रक्रिया इराणच्या अटींनुसार होईल. ज्यामध्ये जहाजांचं तपासणी, निरीक्षण सागरी सेवा आणि सुरक्षेसंदर्भातील उपाय यांचा समावेश असेल. विना शुल्क  जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सोडण्यासंदर्भात सहमती झाल्याचा ट्रम्प यांचा दावा चुकीचा असून कराराच्या मुसद्यात तसा मुद्दा नसल्याचं इराणकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, याशिवाय इराणनं ट्रम्प यांचा अणवस्त्रांसदर्भातील दावा देखील फेटाळला आहे. इराण अणवस्त्र सामग्री साठा नष्ट करणार नाही, ट्रम्प यांचे दावे खोटे  असल्याचं फर्स न्यूजनं म्हटलं आहे. इराणची 12 अब्ज डॉलर्सची गोठवण्यात आली संपत्ती पूर्ववत करावी हा मुद्दा कराराच्या मसुद्यात आहे. गोठवलेली संपत्ती पूर्ववत केली नाही तर इराण करारासाठी पुढं जाणार नाही, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

इराणनं शांतता करारासाठी लेबनॉनमधील शस्त्रसंधी जी हिजबुल्लाहच्या अपेक्षेप्रमाणे असावी अशी भूमिका घेतली आहे. काही प्रमुख अटी पूर्ण केल्यानंतर अणवस्त्र कार्यक्रमावर चर्चा होईल, असं इराणकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळं इराण आणि अमेरिकेत अविश्वासाचं वातावरण दिसून येतंय. आता युद्ध पुन्हा भडकणार की इराण आणि अमेरिकेत शांतता करार होणार हे पाहावं लागेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now