दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी फडणवीसांचे विश्वासू रवींद्र चव्हाण: कोणीही अर्ज न भरल्यामुळे बिनविरोध निवड, ठरले पक्षाचे बारावे प्रदेशाध्यक्ष
विधिमंडळ अधिवेशन: दुसरा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नाने गाजला; नाना पटोले निलंबित, काँग्रेससह विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार
राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम वाळू चोर: अनिल परब यांचा विधान परिषदेच्या पटलावर आरोप; चोरीचे ठोस पुरावे असल्याचा दावा
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अंबादास दानवे आक्रमक: प्रश्नांचा भडिमार करत सरकारला विचारला जाब; कालबद्ध कार्यक्रम आखण्याची मागणी
सरकारनं त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर रद्द केल्यानंतर 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा साजरा करणार, वाजत गाजत गुलाल उधळत येण्याचं उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंचं निमंत्रण
देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना फोडण्याचा जीआर काढला तरी मराठी माणूस एकत्रच, आम्हाला जीआरच्या गोष्टी सांगू नका; संजय राऊतांचा पलटवार
कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवारांना उद्धव ठाकरेंचा फोन, मातोश्रीवर भेटायला येण्याचा आदेश, सुनील प्रभूंच्या मध्यस्तीने नाराजी दूर
बीड लैंगिक छळ प्रकरणातील शिक्षकांच्या पोलीस कोठडीत 5 जुलैपर्यंत वाढ, न्यायालयाचे आदेश
चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बोचरा सवाल, ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर बोलणे टाळले
बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच तुमचा मुलगा उभा राहिला, तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांची टीका
नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार, कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखला
आषाढी वारीच्या शासकीय पुजेआधी शेतकरी कर्जमाफीसह शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, 4 जुलैला पांडुरंगाला घालणार साकडं
धुळ्यात काँग्रेसला खिंडार, राहुल गांधींचे निकटवर्तीय माजी आमदार कुणाल पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश
बीड लैंगिक छळ प्रकरण! मी त्यांच्यासारखा 150 दिवस पळून गेलो नाही, धनंजय मुंडेंच्या खळबळजनक आरोपावर संदीप क्षीरसागरांचा पलटवार
मोदी तुमचे बाप असतील, शेतकऱ्यांचे नाही, काँग्रेस आमदार नाना पटोले विधानसभेत आक्रमक, भाजपच्या बबनराव लोणीकरांवर हल्लाबोल, राजदंड उचलण्याचा प्रयत्न केल्याने निलंबन
राणे फॅमिलीची चोच नेहमी नरकातच बुडालेली असते, भास्कर जाधवांचा नारायण राणेंवर हल्लाबोल; ‘नेपाळी वॉचमन’ म्हणत नितेश राणेंवरही टीका
जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार, भारताचे सहायक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांची माहिती, कर्णधार शुभमन गिलचं टेन्शन मिटणार
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, धोकादायक गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघात स्थान नाही
CSK ला संजू सॅमसनला संघात घ्यायचे आहे: ऋतुराजच्या जागी घेतले जाऊ शकते; त्याने 2022 मध्ये RRला फायनलमध्ये पोहोचवले होते
बर्मिंगहॅम कसोटीत भारत 3 बदल करू शकतो: शार्दुल व जडेजाची जागा घेऊ शकतात नितीश-सुंदर, कुलदीपचे पुनरागमन शक्य