सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता येत्या ५ जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याची अधिकृत निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. वरळीतील प्रसिद्ध डोम सभागृहात हा ऐतिहासिक मेळावा पार पडणार आहे. त्याच्या निमंत्रण पत्रिकेत ‘राज ठाकरे – उद्धव ठाकरे’ असे नमूद करण्यात आले आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता येत्या ५ जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याची अधिकृत निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. वरळीतील प्रसिद्ध डोम सभागृहात हा ऐतिहासिक मेळावा पार पडणार आहे. त्याच्या निमंत्रण पत्रिकेत ‘राज ठाकरे – उद्धव ठाकरे’ असे नमूद करण्यात आले आहे, ज्यामुळे दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात मराठी एकजुटीने मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. निमंत्रण पत्रिकेत थेट मराठी जनतेला उद्देशून भावनिक आवाहन करण्यात आले आहे. “आवाज मराठीचा!” असे शीर्षक या पत्रिकेला देण्यात आले आहे. “मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं!” असेही यात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण
आवाज मराठीचा ! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का ? तर हो नमवलं…! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं ! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय…!, आपले नम्र राज ठाकरे – उद्धव ठाकरे, असा मजकूर या पत्रिकेत पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.