टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी वातावरण तापले, रोहित पवारानंतर जय पवारही मैदानात ?

Jay Pawar Press Conference: आमदार रोहित पवार यांनी अजितदादांचा विमान अपघात की घातपात याबाबत काहूर उठवलं आहे. सध्या ते दिल्ली दौर्‍यावर आहेत. काल त्यांनी आपचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल, आपचे खासदार यांची भेट घेतली. तर इतरही विरोधी पक्षांच्या भेट ते घेणार आहेत. आता जय पवारही याच विषयावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Jay Pawar: रोहित पवारानंतर जय पवारही मैदानात? अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी वातावरण तापले, उद्याच्या पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडणार?

Jay Pawar on Ajit Pawar: आमदार रोहित पवार यांनी अजितदादांचा विमान अपघात की घातपात याविषयी सध्या रान उठवलं आहे. त्यांना चार पत्रकार परिषद घेत हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे यंत्रणांची उडालेली भांबेरी समोर आलेली आहे. तपासातील तफावत आणि यंत्रणांचे दावेही तपासाच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. रोहित पवार यांचे मुद्देसुद सादरीकरण आणि DGCA, CID, AAIB विमान अपघात तपास ब्युरोच्या तपासावर त्यांनी उपस्थित केलेल्या शंका यामुळे सध्या काहूर उठले आहे. दोन दिवसांपासून रोहित पवार हे दिल्लीत तळ ठोकून आहेत. काल त्यांनी आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह यांची भेट घेतली. ते राहुल गांधी आणि नंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या घडामोडी घडत असतानाच आता अजितदादांचे पुत्र जय पवार हे उद्या पत्रकार परिषद (९ मार्च) घेत आहेत. ते आता कोणती भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

VSR कंपनीबाबत जय पवारांची पत्रकार परिषद

अजितदादांचे सुपुत्र जय पवार हे सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत आहेत. VSR कंपनीबाबत त्यांची ही पत्रकार परिषद होणार असल्याचे समजते. व्हीएसआर कंपनीबाबत जय पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. काही दिवसांपूर्वी जय पवार यांनी व्हीएसआस कंपनीचा मालक रोहित सिंगचा सह वैमानिकाच्या आसनावर झोपलेला फोटो ट्विट केला होता. त्यानंतर सोमवारच्या पत्रकार परिषदेत ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये काय?

“माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे.

मी DGCA ला ठामपणे मागणी करतो — या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे… माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी.” अशी पोस्ट जय पवार यांनी काही दिवसांपूर्वी इ्न्स्टाग्रामवर केली होती. त्यातून जय पवार यांचा रोख स्पष्ट होतो. आता ते उद्या व्हीएसआर कंपनीबाबत काय खुलासा करतात याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

तर रोहित पवार यांनी अजितदादांच्या निकटवर्तीय नेत्यांना मोठे आवाहन केले आहे. तुम्ही अजितदादा प्रेमी असाल तर गुन्हा नोंदवण्यासाठी दबाव टाकण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांचा रोख कुणाकडे आहे हे वेगळं सांगायला नको. याविषयावर अजितदादांच्या पक्षातील नेते बोलत नसल्यावर त्यांनी खोचक टीका केली आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Omraje Nimbalkar : तुम्ही उद्धव ठाकरे गटासोबत आहात का? ओमराजे निंबाळकर यांचं सूचक उत्तर VIDEO

Operation Tiger UBT Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!

Sanjay Raut on Operation Tiger: उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर भावासारखं प्रेम केलं, पण हे भोसxxx यांच्या अंगात गद्दारी भिनलीय; संजय राऊतांची फुटीर खासदारांवर आगपाखड

Ubt Split : ठाकरेंसोबत असलेले खासदार राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांचा ऑफरबाबत खळबळजनक गौप्यस्फोट, ‘एकनाथ शिंदेंनी आमच्याशी..’

ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याची जोरदार चर्चा… ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया काय? ट्विट व्हायरल

Operation Tiger UBT Shivsena: सहा खासदार फुटताच उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल, सर्व खासदारांना व्हीप धाडला, संसदीय दलाची बैठक बोलावली