टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

‘कोकाटेंची खाती कुणाला द्यायची, ते सांगा?’ फडणवीस-अजितदादांच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी!

Follow Us:

Manikrao KoKate:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Manikrao KoKate: महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि  बंधू विजय कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवताना कोकाटे बंधूंचे अटकेचे निर्देश दिले आहेत.  माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांचं अटक वॉरंट कोणत्याही क्षणी निघू शकते. शासकीय कोट्यातील दहा टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी कोकाटे यांना दोन वर्ष आणि दहा हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवताना कोकाटे यांच्या अटकेचे निर्देश दिले आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काय झालं या बैठकीत? सविस्तर जाणून घेऊया.

कोण आहेत माणिकराव?

माणिकराव कोकाटे हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. सिन्नर मतदारसंघातून पाच वेळा आमदार झाले आहेत. सध्या क्रीडा मंत्री आहेत. हे प्रकरण जुने असले तरी शिक्षा कायम झाल्याने त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आहे. उच्च न्यायालयात अपील केले जाईल आणि तिथे शिक्षेवर स्थगिती मिळाली तर पद टिकू शकते. अन्यथा अटक आणि पद गमावण्याची शक्यता आहे. हे प्रकरण सरकारला आणि पक्षाला अडचणीचे ठरू शकते.

 

काय आहे नेमकं प्रकरण?

महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 1995 सालच्या शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. याआधी 20 फेब्रुवारी 2025 रोजी प्रथम वर्ग न्यायालयाने हीच शिक्षा सुनावली होती, जी आता अपीलात टिकली आहे. या निर्णयामुळे मंत्री कोकाटे यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आली आहे, कारण दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षेच्या प्रकरणात सदस्यत्व आपोआप रद्द होऊ शकते.

कोकाटे यांच्यावर नेमके कोणते आरोप?

1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातील 10 टक्के राखीव सदनिकांचे वाटप कमी दरात करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. कोकाटे बंधू (माणिकराव आणि त्यांचे भाऊ विजय किंवा सुनील) यांनी अल्प उत्पन्न गटात येत असल्याचे आणि शहरात घर नसल्याचे खोटे दाखवले. नाशिकच्या उच्चभ्रू भागात दोन सदनिका मिळवल्या. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून 1997 मध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. एकूण चार आरोपी होते, त्यात कोकाटे बंधू आणि इतर दोघांचा समावेश.

मंत्र्याला मंत्रिपदावर असताना अटकेची कारवाई होत असेल तर ही लाजिरवाणी परिस्थिती असेल. या घटनेचे गांभीर्य ओळखून अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. दुसरीकडे माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल आहे. हायकोर्टाने यात स्थगिती दिली नाही तर कोकाटेंची अटक अटळ आहे. कोकाटेंना राजीनामा द्यावा लागणार आहे. दरम्यान हायकोर्टाच्या निर्णयावर साऱ्यांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीर राज्यातील मंत्री शिक्षेस पात्र असेल तर ते धक्कादायक आहे. हा कोर्टाने दिलेला निर्णय आहे. कोकाटेंचा संभाव्य राजीनामा झाला तर राज्य सरकार आणि राष्ट्रवादीसाठी नामुष्कीचा विषय असेल. मंत्रिमंडळ शपथीनंतर 4 महिन्यांतच धनजंय मुंडेंचा राजीनामा घेतला होता.

आता कोकाटेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. कोकाटेना राजीनामा द्यावा लागू शकतो. किंवा त्यांना अटक होऊ शकतो. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडतेय. कोकाटेना हायकोर्टाने दिलासा दिला नाही तर त्यांचा राजीनामा होऊ शकतो. याबाबत फडणवीसांनी अजित पवारांकडे याबाबत विचारणा केल्याची माहिती फडणवीसांनी दिलीय.

कोकाटेंची खाती कुणाला द्यायची, ते सांगा ?

कोकाटेंची खाती कुणाला द्यायची, ते सांगा ? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना विचारलाय. वर्षावरील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अजितदादांना थेट सवाल विचारल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. कोकाटेंच्या अटकेला हायकोर्टाने स्थगिती दिली तरच कोकाटेंचे मंत्रिपद वाचू शकते. पण, तसे न झाल्यास कोकाटेंचे खाते कुणाला द्यायचे, ते सांगा असे फडणवीस म्हणाल्याची माहिती समोर आलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात माणिकरावांच्या अटकेसंदर्भात चर्चा झाली.

न्यायालयीन प्रक्रिया 

हे प्रकरण जवळपास 28-30 वर्षे चालले. फेब्रुवारी 2025 मध्ये प्रथम वर्ग न्यायालयाने दोन वर्षे तुरुंगवास आणि 50 हजार दंड ठोठावला होता. त्याविरोधात अपील केले असता, जिल्हा सत्र न्यायालयाने (न्यायाधीश पी. एम. बदर) शिक्षा कायम ठेवली, मात्र दंडाची रक्कम 10 हजार रुपये केली. शिक्षा सुनावल्यानंतर काही तासांत जामीन मिळाला होता, पण आता अपीलात शिक्षा टिकल्याने अटकेची शक्यता आहे. कोकाटे उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले जाते.

विरोधकांच्या मागण्या

शिक्षा कायम झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा आणि आमदारकी रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे. नैतिकतेनुसार राजीनामा द्यावा, असा दबाव आहे. याआधीही कोकाटे वादात होते – कृषी मंत्री असताना शेतकरी विधानामुळे आणि विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खाते बदलले गेले. आता हे प्रकरण त्यांच्यासाठी मोठा धक्का मानले जाते.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

22 आमदार घेऊन सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपमधून लढणार; रोहित पवारांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच

इराण अमेरिका युद्धाबाबत अत्यंत मोठी घोषणा, युद्ध कधी थांबणार थेट सांगितले स्पष्ट

CSK vs LSG IPL 2026 : चेन्नईचा सुपरहिट शो! एका विजयाने पॉइंट्स टेबलचं गणित बदललं, IPL मधून बाहेर होणारा लखनऊ पहिला संघ

कोणी हळदीसाठी जात होतं, तर कोणी लग्नावरुन परतत होतं पण नियतीने…; महाराष्ट्रात रस्ते अपघातांचे भीषण सत्र सुरू

Horoscope Today 8th May 2026 : चिंता सोडा, निवांत रहा.. या राशीला शुक्रवारी मिळेल मोठी ऑफर ! वाचा मेष ते मीनचं भविष्य