टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा

Follow Us:

Vidhan Parishad Election Solapur : सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारीवर मोठी चुरस असून महिला आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर दिला जात आहे.

Solapur Politics : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्याला एक जागा मिळण्याचे निश्चित मानले जात असून पक्षाच्या नव्या धोरणामुळे अनेक नवे चेहरे चर्चेत आले आहेत. भाजपकडून यावेळी विधानसभा किंवा लोकसभा न लढविलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा विचार सुरू आहे. यासोबतच महिलांना 33 टक्के प्रतिनिधित्व देण्याच्या भूमिकेमुळे महिला उमेदवारांचाही विचार पुढे येत आहे. जातीय समतोल साधण्याचाही प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे.

Vidhan Parishad Candidates Discussion : चार नावांची चर्चा

सध्या सोलापूर जिल्ह्यातून चार प्रमुख नावांची चर्चा रंगली आहे. यामध्ये राजश्रीताई नागणे पाटील, प्रशांत परिचारक, राजन पाटील आणि प्राध्यापक शिवाजी सावंत यांचा समावेश आहे. या चार नावांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Solapur Women Focus : महिला उमेदवारांना प्राधान्य?

महिलांना संधी देण्याच्या धोरणामुळे सांगोल्यातील राजश्रीताई नागणे पाटील यांचे नाव आघाडीवर आले आहे. त्यांनी पक्ष संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.

पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. पक्षाच्या आदेशानुसार यापूर्वी त्यांनी निवडणुकीत माघार घेतल्याने यावेळी त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

BJP Political Strategy : शिवसेनेला प्रत्युत्तर देण्याची तयारी

नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राध्यापक शिवाजी सावंत यांचे नावही चर्चेत आहे. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि शिवसेनेच्या हालचाली लक्षात घेता भाजप त्यांचा वापर रणनीती म्हणून करू शकते.  त्याचवेळी यापूर्वी चर्चेत असलेले राजेंद्र राऊत, राम सातपुते, रणजीत निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची नावे आता मागे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या आधी जिल्ह्यातून रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेचे आमदार होते. ते मराठा समाजाचे असल्याने यावेळी मराठा समाजातील मजबूत चेहरा देण्यावरही भाजपचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
  • उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
  • उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
  • मतदानाची तारीख: 12 मे 2026
  • मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
  • मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur : अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल, धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

Omraje Nimbalkar : तुम्ही उद्धव ठाकरे गटासोबत आहात का? ओमराजे निंबाळकर यांचं सूचक उत्तर VIDEO

Operation Tiger UBT Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!

Sanjay Raut on Operation Tiger: उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर भावासारखं प्रेम केलं, पण हे भोसxxx यांच्या अंगात गद्दारी भिनलीय; संजय राऊतांची फुटीर खासदारांवर आगपाखड

Ubt Split : ठाकरेंसोबत असलेले खासदार राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांचा ऑफरबाबत खळबळजनक गौप्यस्फोट, ‘एकनाथ शिंदेंनी आमच्याशी..’

ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याची जोरदार चर्चा… ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया काय? ट्विट व्हायरल