टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सह्याद्रीची माजी विद्यार्थिनी वैष्णवी रसाळ हिची NEET व JEE मध्ये उत्तुंग झेप

On: June 18, 2025 11:35 AM
Follow Us:

सांगोला : सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलची माजी विद्यार्थिनी कु. वैष्णवी दत्तात्रय रसाळ हिने नीट 2025 परीक्षेत 589 गुण मिळवत राष्ट्रीय स्तरावर AIR 2384 असा घवघवीत क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर JEE Mains परीक्षेत तिने 99.14 टक्केवारी मिळवून सांगोला तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.

वैष्णवी हिचे प्राथमिक शिक्षण नर्सरी ते दहावीपर्यंत सांगोला येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. शालेय जीवनातच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने यश मिळवत तिने आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली. दहावीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवत तिने लातूरच्या प्रतिष्ठित शाहू कॉलेजमध्ये अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले.

अत्यंत अभ्यासू, शांत, शिस्त प्रिय व विद्यार्थ्यांमध्ये आदर्श अशी वैष्णवी ही सुरुवातीपासूनच सर्व शिक्षकांची लाडकी विद्यार्थिनी होती. सह्याद्रीची आदर्श विद्यार्थिनी म्हणून पण तिचा सन्मान करण्यात आला होता. तिच्या या यशामध्ये तिचे पालक श्री. दत्तात्रय रसाळ व सौ. स्वाती रसाळ यांचे योगदान तर आहेच, त्याचबरोबर तिची मोठी बहीण अस्मिता रसाळ — ती देखील सह्याद्रीची माजी विद्यार्थिनी असून सध्या BDS (दंतवैद्यक) शिक्षण घेत आहे — हिचे सततचे मार्गदर्शनही तिला लाभले.

तिच्या या उज्वल कामगिरीमुळे संपूर्ण सह्याद्री शाळेत आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे. प्रशालेचे संस्थाध्यक्ष डॉ. दिलीप कुमार इंगवले, सचिवा सौ सुवर्णा इंगवले, व्यवस्थापिका सौ. अनिता इंगवले, मुख्याध्यापिका सौ. प्रमोदिनी जाधव तसेच संपूर्ण शिक्षकवृंद यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

 

हे ही वाचा 

सांगोला शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर; बुधवार दि.18 जून 2025

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा