टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Plane crash : विमानाचा भीषण अपघात, लँडिगच्या तयारीमध्ये असताना थेट खाली कोसळलं, सर्व प्रवाशांचा मृत्यू

On: August 22, 2026 10:29 AM
Follow Us:

पुन्हा एकदा विमान अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे, विमान लँडिंगच्या तयारीमध्ये असातना जमिनीवर कोसळलं आहे, हा अपघात इतका भीषण होता, की विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Plane crash : विमानाचा भीषण अपघात, लँडिगच्या तयारीमध्ये असताना थेट खाली कोसळलं, सर्व प्रवाशांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून विमान अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. 22 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये विमानाचा भीषण विमान अपघात झाला होता, या अपघातामध्ये विमानातील 242 प्रवशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला, त्यानंतर देखील देशात विमान अपघाताच्या काही घटना घडल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी पेनसिल्व्हेनियामधील कार्लाइलमध्ये विमान आणि हेलिकॉप्टर याची धडक झाली होती. या घटनेत पायलटचा मृत्यू झाला तर हेलिकॉप्टरमध्ये असलेले दोन जण गंभीर जखमी झाले. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पुन्हा एकदा एका विमानाचा भीषण अपघात झाल आहे, या अपघातामध्ये विमानात असलेल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

ही घटना अलास्कामध्ये घडली आहे, अलास्कामध्ये एक चार्टर प्लेन क्रॅश झालं आहे. या विमानामध्ये दोन पायटसह एकूण 8 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातामध्ये या आठही जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा बोर्ड (NTSB) ने दिलेल्या माहितीनुसार या विमानाने अलास्काच्या आंकरेज येथून उड्डान केलं होतं. हे विमान नूवेनहॅमच्या दिशेनं निघालं होतं. विमान लँडिंगच्या तयारीमध्ये असतानाच ही दुर्घटना घडली आहे. विमान कोसळलं, हा अपघात इतका भीषण होता की या विमानातील आठही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अलास्का रेस्क्यू कॉऑर्डिनेशन सेंटरच्या वतीने तातडीने घटनास्थळी धाव घेण्यात आली. त्यांनी अपघातस्थळी शोध मोहीम राबवली. मात्र या विमानातील 8 ही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे विमान लँड होत असताना हा अपघात झाल्याची माहिती अलास्का रेस्क्यू कॉऑर्डिनेशन सेंटरच्या वतीने देण्यात आली आहे.

या विमानाचा अपघात ज्या विमानतळावर झाला ते विमानतळ अमेरिकेच्या वायुदलाचं विमानतळ आहे. या विमानतळाची धावपट्टी 4,000 फूट लांब आहे. हे विमानतळ तीव्र उतारावर असल्यामुळे या विमानतळावर विमान लँड करणं हे खूप कठीण काम मानलं जातं. या विमानतळाच्या सर्व बाजूने उंच डोंगर आहेत, त्यामुळे पायलटला विमान लँड करताना बरोबर अंदाज येत नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या घटना इथे घडतात. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला, अपघाताचं कारण काय? याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now