टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Raja Shivaji Box Office: रितेशच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी रचला इतिहास, मराठीत बिगेस्ट ओपनर ठरला ‘राजा शिवाजी’

Raja Shivaji Box Office: ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला… पहिल्याच दिवशी सिनेमाने रचला मोठा इतिहास, मराठीत बिगेस्ट ओपनर ठरला ‘राजा शिवाजी’, कमाईचा आकडा थक्क करणारा

Raja Shivaji Box Office: रितेशच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी रचला इतिहास, मराठीत बिगेस्ट ओपनर ठरला 'राजा शिवाजी'

Raja Shivaji Box: अभिनेता रितेश देशमुख, सलमान खान, अभिषेक बच्चन, संजय दत्त, अभिनेत्री जिनिलिया देशमुख, विद्या बालन, भाग्यश्री यांसारखे 90 च्या दशकातील सुपरस्टार बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहेत. सांगायचं झालं तर, गेल्या काही वर्षांपासून दिग्दर्शत सिनेमात नवीन प्रयोग करताना दिसत आहे आणि हेच नवं रुप प्रेक्षकांना देखील आवडत आहे. ‘छावा’, ‘धुरंधर’ सिनेमाच्या दोन भागांनंतर ‘राजा शिवाजी’ सिनेमा चाहत्यांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी सिनेमाने मोठा इतिहास रचला आहे. पहिल्याच दिवशी ‘राजा शिवाजी’ सिनेमा मराठीसाठी बिगेस्ट ओपनर ठरला आहे.

अभिनेता रितेश देशमुख याच्या ऐतिहासिक सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा इतिहास रचला आहे… सिनेमा मराठीसाठी सर्वोच्च ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे… सिनेमाने पहिल्याच दिवशी डबल डिजीटमध्ये ओपनिंग केली आहे. सॅकनिक्लच्या रिपोर्टनुसार, सिनेमाने आचापर्यंत 11.35 कोटींची कमाई केली आहे.

यामध्ये मराठी भाषेत प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाने 8 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर हिंदी भाषेत सिनेमाने 3.35 कोटी जमा केले आहेत. सांगायचं झालं तर, हे तर सुरुवातीचे आकडे आहे. पण अधिकृत आकडा समोर आल्यानंतर काही बदल होण्याची देखील शक्यता आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे 100 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘राजा शिवाजी’ सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख, यांनी महत्त्वाची भूमिका साकारली असून अभिनेता सलमान खान याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

‘राजा शिवाजी’ सिनेमात रितेश देशमुख याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. तर रितेश आणि जिनिलिया यांच्या जोडील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. सिनेमाचं संगीतही उत्कृष्ट असून ते प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करत आहे. तर सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी चित्रपटगृहाबाहेर पाहायला मिळत आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now