Pune Accident: कारची चावी तशीच राहिली अन् पुढे नको ते घडलं, पुण्यातील सदाशिव पेठेत काय घडलं?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

पुण्यात 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक,

 

Pune Accident: या घटनेनंतर कार चालकासह कार मालकाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. कारचालकामुळे याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याला सुद्धा विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे : पुण्यातील भावे हायस्कूलजवळ एका कारनं 11 विद्यार्थ्यांना (Pune Accident) उडवलं आहे. यातील ताही जण हे एमपीएससी परीक्षांची तयारी करणारे होते अशी माहिती आहे. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुण्यातील मध्यवर्ती भागात भावे हायस्कूलजवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी त्या परिसरात राहतात. संध्याकाळी सगळे विद्यार्थी तिथं चहा घेत होते. चालकाचं नियंत्रण कारवरील सुटल्यानंतर त्यानं विद्यार्थ्यांना धडक दिली. या घटनेत 11 जण जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार सुरु आहेत, 2 विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर कार चालकासह कार मालकाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. कारचालकामुळे याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याला सुद्धा विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.

जयराम शिवाजी मुळे असे या चालकाचे नाव असून दिगंबर माधव शिंदे हा या गाडीचा मूळ मालक आहे. जयराम मुळे याच्यासोबत असलेला सहकारी राहुल गोसावी याला सुद्धा केली पोलिसांनी अटक करण्यात आली आहे, मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे याने त्याच्या मालकीच्या कारची चावी निष्काळजीपणे तशीच गाडीला सोडून बाहेर गेल्यामुळे त्याचा सहकारी जयराम मुळे याने त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील त्याचा सहकारी राहुल गोसावी याच्यासोबत दारूच्या नशेत वाहन थेट सदाशिव पेठेत नेले. या अपघातात 11 लोकांना किरकोळ व गंभीर जखम केल्याप्रकरणी आता तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील मध्यवर्ती भागात हा अपघात झाला आहे. या परिसरात विद्यार्थी नेहमीप्रमाणे चहा घ्यायला येत असतात. समोर कार आली आणि कारचालकाचं नियंत्रण सुटलं. तो गाडी चालवताना दारूच्या नशेत होता.  कार भरधाव वेगानं आली आणि कारचालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट शेजारी चहा पिण्यासाठी थांबलेल्या 11 जणांना उडवलं, यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात भावे  हायस्कूल जवळ हा अपघात  झाला आहे. कार चालकाने 11 जणांना उडवले. ही घटना काल(शनिवारी) संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली घटना आहे. चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आलेल्या एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जखमींमध्ये समावेश आहे. जखमींना संचेती आणि  मोडक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं आहे. मद्यप्राशन करून कॅब चालक कार चालवत होता. भावे हायस्कूल जवळ काही विद्यार्थी एका चहाच्या टपरीवर चहा पीत असताना अपघात घडला आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी असून नऊ जण किरकोळ जखमी झाल्याची पोलिसांची माहिती आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांची आज (रविवारी) परीक्षा होती.

एकनाथ शिंदेंकडून मदतीची शाश्वती

या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जखमींशी फोनद्वारे संवाद साधला. युवा सेनेच्या नेत्या शर्मिला येवले यांनी शिंदेंची विद्यार्थ्यांसह बातचीत करून दिली. लागेल ती मदत आम्ही करू, असे आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिले आहे.

अपघातातील विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी द्यावी

अपघातातील जखमी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांचा आज पेपर होता, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याने आज त्यांना पेपर देता येत नाहीये. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी संधी देण्यात यावी असं म्हटलं आहे, “पुण्यात भावे हायस्कूलजवळील अपघातात एमपीएससी करणारे तरुण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे त्यांना कदाचित आजचा पेपर देता येणार नाही. या विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी प्रदान करणे आवश्यक आहे. यासोबतच शासनाने या विद्यार्थ्यांवरील उपचारांचा खर्च करावा जेणेकरून त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करुन निर्णय घ्यावा ही विनंती”, अशी पोस्ट सुळे यांनी सोशल मिडीयावरती लिहली आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon