टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले

On: April 19, 2026 1:00 PM
Follow Us:

मिळालेल्या माहितीनुसार, 16 आणि 17 वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह गावातीलच एका विहिरीत तरंगताना आढळले. या दोन्ही मुलींचे हात दोरीने बांधलेल्या अवस्थेत होते.

Karnataka News: कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील यड्रावी तालुक्यातील इजेरी गावातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत एका विहिरीत आढळून आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, हा घातपात असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 16 आणि 17 वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह शनिवारी सकाळी गावातीलच एका विहिरीत तरंगताना आढळले. विशेष म्हणजे, या दोन्ही मुलींचे हात दोरीने बांधलेल्या अवस्थेत होते. सकाळी ग्रामस्थ विहिरीकडे गेले असता हा प्रकार उघडकीस आला. आपल्या पोटच्या मुलींची ही अवस्था पाहून पालकांनी घटनास्थळी एकच टाहो फोडला.

पोलीस तपासाला वेग

घटनेची माहिती मिळताच जेवरगी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मुलींचे हात बांधलेले असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास  विविध अंगानी सुरू केला आहे. दोन अल्पवयीन मुलींचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू झाल्याने इजेरी गावात तणावाचे वातावरण आहे. या बहिणींनी असे टोकाचे पाऊल उचलले की त्यांना बळजबरीने विहिरीत ढकलण्यात आले, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now