टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या गळाला? मुख्यमंत्री फडणवीस फिरवणार सुदर्शन चक्र

On: April 20, 2026 7:36 PM
Follow Us:

मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असून, राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.

मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या गळाला? मुख्यमंत्री फडणवीस फिरवणार सुदर्शन चक्र

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला तर काही जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं होतं, त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील महायुतीचा दणदणीत विजय झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बडा नेता शरद पवार यांची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे.

येत्या 23 एप्रिल रोजी राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.  यामध्ये बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुल विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. या मतदार संघात महायुतीकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान या मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तणपुरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांनी या निवडणुकीमधून माघार घेतली आहे. तेव्हापासून प्राजक्त तणपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज प्राजक्त तणपुरे यांची भेट घेतली आहे. राम शिंदे आणि प्राजक्त तणपुरे यांच्यामध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. नेमकी कोणत्या विषयावर ही चर्चा झाली? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. दरम्यान या चर्चेनंतर राम शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. थोड्यावेळात मुख्यमंत्री फडणवीस येणार असून ते सुदर्शन चक्र फिरवणार आहेत, असं सूचक विधान राम शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळे आता प्राजक्त तणपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now