Shahaji Bapu Patil on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) चांगले यश मिळाले होते. यानंतर विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीने (Mahayuti) जोरदार पुनरागमन केले. राज्यात महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला तर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) धक्क्यावर धक्के बसत आहेत. ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अनेक शिलेदार पक्षाला जय महाराष्ट्र करत आहेत. ठाकरे गटाला लागलेल्या गळतीवरून सांगोलाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. एक दिवस आदित्य ठाकरेच (Aaditya Thackeray) उद्धव ठाकरे यांना सोडून जाण्याची भाषा करतील, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
शहाजीबापू पाटील म्हणाले की, कोणत्याही नेत्याच्या किंवा आमदाराच्या चौकशी झाल्या म्हणून ते पक्ष सोडत नाहीत. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तव परिस्थिती जाणवल्याने तिथे थांबण्यात काही अर्थ नाही, अशी भावना नेत्यांच्या मनात झाली आहे. त्यामुळे शिंदे सेनेत गेल्या काही दिवसांपासून मोठी इनकमिंग सुरु आहे. एक दिवस असा उगवेल की, उद्धव साहेबांना सोडायची भाषा आदित्य ठाकरेच करतील, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एकटेच राहण्याची परिस्थिती येऊ शकते,असे देखील शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे.
शहाजीबापूंनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली
दरम्यान, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर हिवाळी अधिवेशनात दावा न करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाने आता येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या पदावर दावा करण्याचे ठरविले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत विचारले असता शहाजीबापू पाटील म्हणाले की, असे काहीही होणार नाही, ठाकरे गटाकडे संख्याबळ नाही. जरी त्यांना हे पद दिले तरी महाराष्ट्रात अतिशय नित्कृष्ट काम करणारा विरोधी पक्ष नेता म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव गाजेल, अशी खिल्ली त्यांनी यावेळी उडवली.
भाजप सदस्य अभियानात सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा राज्यात पहिल्या नंबरवर
Weight Loss: पनीर किंवा मशरूम वजन कमी करण्यासाठी काय खावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या