टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

NEET Exam Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये सर्वात मोठी कारवाई, मोटेगावकर क्लासेसचे शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात

NEET Exam Leak: शिवराज मोटेगावकर हे आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक आहेत. लातूर, पुण्यातल्या चौकशीनंतर मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात घेण्यात आलं आहे.

पुणे: नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर आतून एक मोठी बातमी समोर आली आहे. काल लातूर येथील एका प्राख्यात नीट क्लास संचालकाची (NEEt Exam Leak) शिवराज मोटेगावकर यांची ११ तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. शिवराज मोटेगावकर हे आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक आहेत. लातूर, पुण्यातल्या चौकशीनंतर मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात घेण्यात आलं आहे.(NEEt Exam Leak)

काल  शिवराज मोटेगावकर यांची जवळपास 11 तास चौकशी सीबीआयच्या पथकाने केली, या चौकशीत काय निष्पन्न झालं हे जरी समोर आलं नसलं तरी मात्र क्लास संचालकाची 11 तास चौकशी करून हे पथक दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. लातूर येथील प्राध्यापक एस पी कुलकर्णी या प्राध्यापकाची मास्टर माईंड म्हणून माहिती समोर आल्यानंतर सीबीआयचे पथक लातूर येथे दाखल झालं होतं व त्यांनी एका प्रख्यात क्लास चालकाची 11 तास पासून चौकशी काल केली यामुळे लातूरच नव्हे तर राज्यभरात खाजगी नीट क्लास चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. (NEEt Exam Leak)

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासादरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. लातूर आणि पुणे येथील चौकशीनंतर शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयच्या (CBI) पथकाने ताब्यात घेतले आहे. शिवराज मोटेगावकर हे लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी (RCC) कोचिंग क्लासेस’चे संचालक आहेत. लातूरमधील पेपरफुटी प्रकरणाच्या धागेदोषानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला असून, आता मोटेगावकर यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मोटेगावर यांच्या RCC क्लासमधे शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीची आणि तीच्या वडीलांची देखील CBI कडून चौकशी केली जाते आहे. मोटेगावकर यांच्याकडून NEET चे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे ज्यांना मिळाल्याचा संशय आहे ते विद्यार्थी आणि पालक देखील सीबीआयच्या रडारवर आहेत.

शिवराज मोटेगावकर हे सीबीआयच्या ताब्यात आहेत, सीबीआयकडून तीन दिवसांपासून त्यांची चौकशी केली, आज त्यांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे, त्यांची आधी ११ तास चौकशी करण्यात आली आहे, राज्यासह देशात त्यांच्या क्लासेसच्या शाखा आहेत, यामध्ये नांदेड कनेक्शन समोर आली आहे, मोटेगावकरांच्या क्लासचा यामध्ये काही संबंध आहे का याचा तपास केला जात आहे.

NEEt Exam Leak : नांदेड – खाजगी कोचिंग क्लासेसने सकाळीच विद्यार्थ्यांना घरी पाठवले 

नांदेडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसने सकाळीच विद्यार्थ्यांना घरी पाठवले, सुट्ट्या लागल्याचं कारण देत क्लासेसचं शटर केलं बंद, लातूरमध्ये झालेल्या चौकशीनंतर नांदेडच्या कोचिंग क्लासेसला सुट्टी दिली आहे. शहरातील कोचिंग क्लासेस येथे सकाळी विद्यार्थी आले त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना आजपासून सुट्ट्या लागल्या असं कारण सांगत सर्व विद्यार्थ्यांना हे घरी पाठवलेले आणि त्यानंतर शटरला कुलूप लावत मुख्य कार्यालय बंद ठेवलेले आहे. त्यामुळे आलेल्या विद्यार्थ्यांना देखील प्रश्न पडलेला आहे की नेमकं झाले तरी काय काल लातूर येथे देखील याच खाजगी कोचिंग क्लासेसची चौकशी झाली त्यानंतर त्याच खाजगी कोचिंग क्लासेसला अचानकपणे सुट्टी ही घोषित करण्यात आली आहे त्यामुळे सीबीआयच्या चौकशीच्या भीतीने मुख्यालय बंद ठेवले की काय अशा चर्चा आता नांदेडमध्ये सुरू झाले आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

पुन्हा प्रेम जुळणं कठीण, आम्ही दुसरं लग्न केलं आता…, फडणवीस ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

शिवसेनेची ताकद वाढली; सचिन अहिर यांच्यानंतर आणखी एक आमदार फुटला, शिंदे म्हणाले….

कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत नाव हुडकायचं कसं? जाणून घ्या एका क्लिकवर, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया.. पुन्हा महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ?

Rain Update : महाराष्ट्रात या तारखेला पाऊस घालणार धुमाकूळ, थेट मुसळधार पावसाचा इशारा, जुलैच्या..

ओमराजे निंबाळकर यांचे मंत्रिपदाबद्दल मोठे विधान, थेट म्हणाले, पद मिळवण्यासाठी..