Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
Vidhan Parishad Election 2026: पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत आणखी भर पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक (Vidhan Parishad Election 2026) जाहीर करण्यात आली आहे. 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण 17 जागांवर निवडणूक होणार, ज्यातील एका ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघासाठी देखील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. (Vidhan Parishad Election 2026)
विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)
- निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
- उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
- अर्ज माघारीची मुदत- 4 जून
- मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
- मतमोजणी- 22 जून

पुढील मतदारसंघात होऊ शकते निवडणूक- (Vidhan Parishad Election 2026)
- सोलापूर
- अहिल्यानगर
- ठाणे
- जळगाव
- सांगली-सातारा
- नांदेड
- यवतमाळ
- पुणे
- भंडारा-गोंदिया
- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
- नाशिक
- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
- अमरावती
- धाराशिव-लातूर-बीड
- परभणी-हिंगोली
- छत्रपती संभाजी नगर-जालना
- नागपूर















