Narendra Modi On Shivjayanti 2025: महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
नवी दिल्ली: छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट करत शिवरायांना अभिवादन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओही केला शेअर-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. यामध्ये माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीय. छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी फक्त राजा, महाराजा, राजपुरुष नाहीय, तर माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवात आहेत आणि आराध्य दैवतांपेक्षा मोठं काहीही नाही, असं नरेंद्र मोदी व्हिडीओमध्ये बोलताना दिसताय.
https://twitter.com/narendramodi/status/1892053183679054187
महायुतीत कसलेही ‘कोल्ड वॉर’ नाही- एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री करणार ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे नेतृत्त्व
महिंद्राने ग्राहकांना दिला मोठा धक्का ! आता थार रॉक्स खरेदी करणे झाले महाग; जाणून घ्या नवीन किंमत