टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक

IPL 2026 Playoffs Schedule: आयपीएलच्या प्लेऑफमध्ये चार संघ दाखल झाले असून पहिल्या दोन लढती निश्चित झाल्या आहेत.

IPL 2026 Playoffs Schedule: मुंबई : आयपीएलच्या 19 व्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहोचणारे संघ निश्चित झाले आहेत. राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सचा पराभव करत प्लेऑफमधील स्थान निश्चित केलं. तर, राजस्थानच्या विजयामुळं पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या आशा संपल्या. प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबादर आणि राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये दाखल झाले आहेत.

क्वालिफायर-1 मध्ये बंगळुरु-गुजरात आमने सामने

लीग स्टेजमध्ये गुणतालिकेत पहिल्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु राहिले. तर, दुसऱ्या स्थानी गुजरात टायटन्स आहे. यामुळं या दोन्ही संघांमध्ये क्वालिफायर-1 चा सामना होणार आहे. बीसीसीआयच्या निर्णयानुसार क्वालिफायर-1  चा सामना धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ही मॅच मंगळवारी म्हणजेच 26 मे रोजी होणार आहे. बंगळुरु आणि गुजरात यांच्यातील सामन्यात विजयी होणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर, क्वालिफायर -1 मध्ये पराभूत झालेल्या संघाकडे दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळावं लागेल.

एलिमिनेटरमध्ये राजस्थान आणि हैदराबाद आमने सामने

आयपीएलच्या लीग स्टेजमध्ये गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेले संघ म्हणजेच सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 27 मे रोजी एलिमिनेटरचा सामना होईल. या सामन्यात विजयी होणारा संघ क्वालिफायर- 2 चा सामना खेळेल. क्वालिफायर-2 चा सामना क्वालिफायर-1 मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटच्या सामन्यातील विजयी संघ यांच्यात होईल. क्वालिफायर-2 चा संघ अंतिम सामन्यात दाखल होईल. लीग स्टेजचे सामने संपल्यानंतर आता प्लेऑफचे अंतिम 4 संघ निश्चित झाले असून प्ले-ऑफचा थरार रंगणार आहे. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांनी अव्वल 4 मध्ये जागा मिळवली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध गुजरात टायटन्स (GT) – क्वालिफायर-1 (Qualifier 1) (26 मे 2026)

सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) – एलिमिनेटर (Eliminator) ( 27 मे 2026)

 

आयपीएल प्लेऑफ वेळापत्रक

क्वालिफायर-1 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स,  26  मे – एचपीसीए स्टेडियम, धर्मशाला

एलिमिनेटर- : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 27 मे – न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यू चंदीगड

क्वालीफायर-2 : 29 मे – न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यू चंदीगड

फायनल –  : 31 मे- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद.

 

मुंबईला पराभूत करत राजस्थान प्लेऑफमध्ये

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याच्या निकालावर प्लेऑफमधील चौथा संघ निश्चित होणार होता. राजस्थान पराभूत झालं असतं तर पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी होती. मात्र, राजस्थान रॉयल्सनं मुंबईला 30 धावांनी पराभूत केलं आणि गुणतालिकेत चौथं स्थान पटकावत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Team India T20I Squads : BCCI कडून आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; श्रेयस अय्यर कर्णधार, तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी

Vaibhav Sooryavanshi : हात जोडतो, लांब राहा…; श्रीलंकेत पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीचा पारा चढला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी

IPL चं मैदान गाजवणाऱ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं घर कसं आहे? पाहा Inside Photos

MI vs RR : राजस्थानची विजयासह प्लेऑफमध्ये धडक, मुंबईचा 30 धावांनी धुव्वा, पलटणचा पराभवाने शेवट

IPL Playoffs: आयपीएलमध्ये टाॅप 2 ठरले, पण चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच; कोणाला लाॅटरी लागणार?