टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ambenali Ghat Scorpio Accident: चेंदामेंदा झालेली स्कॉर्पिओ, पाच फूट अंतरावर मृतदेहांची रास, 1000 फूट खाली आंबेनळी घाटातील भयानक दृश्य

On: May 25, 2026 11:44 AM
Follow Us:

Ambenali Ghat Scorpio Accident: साताऱ्यातील आसगाव येथील तरूणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा पोलादपुर आणि महाबळेश्वर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला.

Ambenali Ghat Scorpio Accident: साताऱ्यातील आसगाव येथील तरूणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा पोलादपुर आणि महाबळेश्वर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात भीषण अपघात (Ambenali Ghat Scorpio Accident) झाला. या अपघातामध्ये एकूण 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. सदर स्कॉर्पिओ जीप सुमारे 1000  फुट खोल दरीत कोसळली. आसगावमधील हे तरूण कोकणात दापोली, हर्णे येथे फिरायला गेले होते. परतीच्या प्रवासात आज पहाटे हा अपघात झाला.

स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात काल (24 मे) रात्री घडला. सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील तरुण या स्कॉर्पिओ जिपने प्रवास करत होते. आंबेनळी घाटातील एका तीव्र आणि धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दरीत कोसळली. घाटातील अंधार आणि दरीची खोली जास्त असल्याने अपघाताची भीषणता प्रचंड होती. याचदरम्यान, अपघात झालेल्या स्कॉर्पिओ गाडीचा पहिला फोटोही समोर आला आहे. पूर्णपणे स्कॉर्पिओचा चक्काचूर झाल्याचं दिसून येत आहे. तसेच स्कॉर्पिओच्या 5 फुटांच्या अंतरावर 4 मृतदेह पडले होते. आज सकाळी 10 वाजेपर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. (Ambenali Ghat Scorpio Accident)

अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू, सगळ्यांची नावं आली समोर- (Ambenali Ghat Scorpio Accident)

  1. महेश अनिल पवार (वय 25)
  2. आदित्य अशोक साळुंखे (वय 21)
  3. रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25)
  4. सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20)
  5. अंश समीर चव्हाण (वय 18)
  6. उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21)
  7. अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 25)
  8. नितीन किसन नायकोंडे (वय 35)

स्कॉर्पिओ 1000 फुट दरीत कोसळली- (Ambenali Ghat Scorpio Accident)

स्कॉर्पिओ गाडी खोल 1000 फुट दरीत कोसळल्यामुळे मृत प्रवाशांचे मृतदेह वर आणण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. पोलादपुर तहसिलदार घोरपडे, पोलीस निरिक्षक आनंद रेवडे, महाबळेश्वर ट्रेकर्स, सिस्केप रेस्क्यु टिम, कोलाड रेस्क्यु टिम, सह्याद्री ॲडव्हेंचर, आपदा मित्र आदी रेस्क्यु टीम घटना स्थळी दाखल झाल्या असून मध्यरात्री 3 वाजल्यापासून मदत कार्य सुरु केलं होतं.

आंबेनळी घाटात सातत्याने अपघात- (Ambenali Ghat Scorpio Accident)

सर्व तरुण फिरण्यासाठी 22,23 ,24 अशा दिवशी दापोली तालुक्यातील हर्णे परिसरात गेले होते. मात्र रात्री परतीच्या दिशेने निघत असताना सातारा आणि रायगड जिल्ह्याना जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दाभिल गावाजवळ एका मुख्य वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि स्कॉर्पिओ जीप 1000 फूट खोल दरीत कोसळली. आतापर्यंत 2 जणांचा मृतदेह हाती लागला असून उर्वरित मृतदेह शोधण्याचे काम बचाव यंत्रणेकडून सुरू आहे. रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर पोलिस ठाणे हद्दीत असणारा हा परिसर असून 28 जुलै 2018 रोजी याच परिसरात दापोली कृषिविद्यापीठमधील शिक्षकांच्या बसचा अपघात होऊन एकूण 33 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. अरुंद रस्ते, रखडलेले कामे, तुटलेले बरीगेट्स आणि अपुरी व्यवस्था यामुळे सातत्याने या घाटात अपघात होत आहेत. त्यामुळे प्रवासी आणि स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Accident News: उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा

धाड… धाड… कोसळले सोने, उच्चांकापेक्षा 56 हजारांनी सोने स्वस्त, थेट..

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

Rohit Pawar Ujani Dam: पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात; १५०० की ३०००?

RBI Plastic Note : आता कागदी नाही तर प्लास्टिकच्या नोटा येणार; आरबीआयची मोठी तयारी, तारीखही ठरली