महिंद्राने आपल्या 5-डोअर थार रॉक्सची किंमत वाढवली आहे. त्यामुळे ग्राहकांना ही कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.
महिंद्राने आपल्या 5-डोअर थार रॉक्सची किंमत वाढवली आहे. त्यामुळे ग्राहकांना ही कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. कंपनीने थार रॉक्सच्या किमतीत 2.86% वाढ केली आहे ज्यामुळे ह्या कारची किंमत 60 हजारांपर्यंत वाढली आहे. ही किंमत वाढ पेट्रोल आणि डिझेल दोन्ही मॉडेल्सवर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने थार रॉक्स पेट्रोलच्या 5 व्हेरिएंट पैकी एका व्हेरिएंटची किंमत वाढवली आहे. तर डिझेलच्या 13 व्हेरिएंटपैकी 6 व्हेरिएंटच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. दोन्ही मॉडेलच्या एंट्री लेव्हल व्हेरिएंटच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तसेच थार रॉक्स पेट्रोलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपये आणि डिझेलची सुरुवातीची किंमत 13.99 लाख रुपये आहे.
महिंद्रा थार रॉक्स पेट्रोल व्हेरिएंटच्या नवीन किमती पुढील प्रमाणे
MX1 MT ची किंमत 12.99 लाख रुपये, MX3 AT ची किंमत 14.99 लाख रुपये, MX5 MT ची किमतीत कोणताही बदल नाही. आणि MX5 AT ची किंमत 17.99 लाख रुपये आहे. तसेच AX7 LAT ची नवीन किंमत आता 20.49 लाख रुपये झाली आहे आधीची किंमत 19.99 लाख रुपये होती. जी आता 50 हजारांनी महाग झाली आहे.
महिंद्रा थार रॉक्स डिझेल व्हेरिएंटच्या नवीन किमती पुढील प्रमाणे
MX1 MT 13.99 लाख रुपये आहे, MX3 MT किंमत 15.99 लाख रुपये आहे, AX3 L MT 16.99 लाख रुपये आहे, MX5 MT ची किंमत 16.99 लाख रुपये आहे, MX5 MT ची किंमत 18.84 लाख रुपये आहे, AX5 LAT च्या किमतीत कोणताही बदल नाही.
तसेच, MX5 MT 4×4 ची नवीन किंमत आता 19.09 लाख रुपये आहे जी आधी 18.79 लाख रुपये होती. AX5 L AT 4×4 ची नवीन किंमत आता 21.09 लाख रुपये आहे जी आधी 20.99 लाख रुपये होती. AX7 L MT ची नवीन किंमत आता 19.49 लाख रुपये आहे जी आधी 18.99 लाख रुपये होती. AX7 L MT 4×4 ची नवीन किंमत आता 21.59 लाख रुपये आहे. जी आधी 20.99 लाख रुपये होती. AX7 LAT ची नवीन किंमत आता 20.99 लाख रुपये आहे जी आधी 20.49 लाख रुपये होती. AX7 L AT 4×4 ची नवीन किंमत आता 23.09 लाख रुपये आहे जी आधी 22.49 लाख रुपये होती.
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा ‘ईद’ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार