टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

MPSC आंदोलन संपणार? हायकोर्टात काय घडलं?

On: October 7, 2026 11:46 PM
Follow Us:

पुण्यात विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन न्यायालयाने केले. मात्र, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाचा अधिकारही न्यायालयाने मान्य केला.

आंदोलनामुळे पुण्यातील काही प्रमुख मार्ग आणि पूल बंद होत असल्याने वाहतूक कोंडी तसेच नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा सुनावणीदरम्यान उपस्थित करण्यात आला. विद्यार्थ्यांना आंदोलन सुरू ठेवायचे असल्यास त्यांनी दुसरी जागा निवडून त्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

आंदोलनाची परवानगी 2 ऑक्टोबरपर्यंत होती. त्यानंतरही आंदोलन सुरू असल्याचे सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. MPSC अध्यक्षपदाबाबत राज्यपालांकडे निर्णयाची विनंती करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.

दरम्यान, MPSC मधील सुमारे 7 हजार रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता असावी आणि सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी, अशी भूमिका न्यायालयाने मांडली.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे संपणार की दुसऱ्या ठिकाणी सुरू राहणार, तसेच सरकार आणि राज्यपालांकडून पुढील निर्णय काय घेतला जातो, याकडे आता लक्ष लागले आहे. पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला होणार असल्याचे समोर आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now