Malegaon Election 2025: सहकार बचाव पॅनलला फक्त एक जागा जिंकता आल्या आहेत. सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत.
Malegaon Election 2025: माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर (Malegaon Sahakari Sakhar Karkhana Election) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलने 21 पैकी 20 जागा जिंकल्या आहेत. तर सहकार बचाव पॅनलला फक्त एक जागा जिंकता आल्या आहेत. सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे (Chandrarao Taware) एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत.
शरद पवार पॅनेलचा सुपडा साफ-
शरद पवारांच्या बळीराजा सहकार बचाव आणि कष्टकरी शेतकरी पॅनलचा सुफडा साफ झाला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान पार पडले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी जवळपास 35 तास चालली. माळेगाव कारखाना निवडणूक यावेळी खूपच चर्चेत आली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या निवडणुकीत स्वतःला चेअरमनपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष गेले.

कोण आहेत चंद्रराव तावरे?
अजितदादांच्या पॅनेलची मुख्य लढत चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलसोबत होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव दादांच्या टीममध्ये एकेकाळी काम केलेले चंद्रराव तावरे आहेत. त्यांनी वसंतदादांना नेहमीच आदरस्थानी मानले.स्वातंत्र्य मिळावे म्हणून लढलेली वसंतदादांची पिढी आणि या पिढीचा सहवास मार्गदर्शन आशीर्वाद लाभलेली चंद्रराव अण्णा यांची पिढी. वय झाले तरी काही विचार मूल्य सोबत घेऊन लढत रहायचा चंद्रराव तावरेंचा स्थायीभाव. वयाच्या 85 व्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात असलेले चंद्रराव अण्णा तावरे यांचे सर्व पॅनेल जवळपास पराभूत झाले. मात्र लोकांनी चंद्रराव तावरे यांना स्वीकारले. समोर अजितदादा यांच्या पॅनेलचे तगडे आव्हान असतानाही अण्णा त्या वादळात विजयी झाले. सगळे उमेदवार पराभवाच्या छायेत असताना पहिल्या फेरीपासून चंद्रराव तावरे आघाडीवर होते, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. सर्व पॅनेलमध्ये वयाने सर्वात जास्त अगदीच वयोवृद्ध म्हणावे, अशा चंद्रराव अण्णा यांना लोकांनी कौल दिला ही एक महत्वपूर्ण घटना आहे.
Malegaon Sugar Factory Result Winning Candidates List : निळकंठेश्वर पॅनलचे विजयी उमेदवार
ब वर्ग
1) अजित पवार
भटक्या विमुक्त राखीव
2) श्री विलास देवकाते
अनुसूचित जाती राखीव
3) रतन कुमार भोसले
इतर मागासवर्ग राखीव
4) नितीन कुमार शेंडे
महिला राखीव
5) सौ संगीता कोक
6) सौ ज्योती मुलमुले
माळेगाव गट : 01
7) शिवराज जाधवराव
8) राजेंद्र बुरुंगले
9) बाळासाहेब तावरे
पणदारे गट : 2
10) योगेश जगताप
11) तानाजी कोकरे
12) स्वप्नील जगताप
सांगवी गट : 01
13) चंद्रराव तावरे