Konkan Rain Updates: राज्यभरात पावसानं (Rain Updates) दमदार हजेरी लावली आहे. अशातच ठाणे, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्गात पुढील 3 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Konkan Rain Updates: राज्यभरात पावसानं (Rain Updates) दमदार हजेरी लावली आहे. अशातच ठाणे, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्गात पुढील 3 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर रायगड (Riagad) जिल्ह्याला आज हवामान विभागाचा मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या सकाळपासून आज (24 जून) आकाशात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. तर रायगड जिल्ह्याला काल पावसाने झोडपले असून अलिबागमध्ये रात्री मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याचा प्रकार समोर आलाय. अशातच आज देखील पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना आहेत. (Konkan Rain Updates)
दुसरीकडे, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्गात पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन तासासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडमध्ये अलिबाग मुरूड तालुक्यात अखेर पावसाची रिमझिम सुरू झाली असून सखल भागात रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तर अलिबाग शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना देखील कसरत करावी लागतेय.
Raigad Rain : रायगड जिल्ह्यात आज हवामान विभागाचा पावसाचा अंदाज; नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
रायगड जिल्ह्यात आज हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. अलिबाग शहरात पी एन पी नगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शहरातील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. तर समुद्रात देखील पाण्याला उधाण आल्याने मच्छीमार आणि किनारी पट्टीतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Pen News : गणेश मूर्ती कारखान्याला पावसाचा फटका; कारखान्यात पाणी शिरल्याने गणेशमूर्ती भिजल्या
रायगडच्या पेण तालुक्यात झालेल्या पावसाचा फटका एका गणेशमूर्ती कारखानदाराला बसला आहे. पेणच्या कळवा गावात पावसाचे पाणी वाहून नेणारा नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडल्यामुळे पाणी थेट गणेश मूर्ती कारखान्यात शिरले आणि येथील कारखान्यात असणाऱ्या गणेश मूर्ती भिजल्या आहेत. यावर स्थानिक प्रशासनाने मार्ग काढावा, अशी मागणी कारखाना मालकाने केली आहे.
Ratnagiri : चुकीच्या खोदाईमुळे संरक्षक भिंतीसह रस्ता खचला
दरम्यान, रत्नागिरीमध्ये चुकीच्या खोदाईमुळे संरक्षक भिंतीसह रस्ता खचलाय. रत्नागिरी शहरातील मधला फगार वठार येथील हि घटना आहे. यात 70 ते 80 फूट संरक्षक भिंत कोसळली असून संरक्षक भिंतीला लागूनच अवैध खोदकाम सुरू होतं. मधला फगरवठार मधील 7 ते 8 घरांना यामुळे धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, रत्नागिरी शहरातील फगरवठार मधून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. रस्ता खचल्याने लागून असलेलं आंब्याचं झाड देखील कोसळलंय. स्थानिक नगरसेवक निमेश नायर देखील घटनास्थळी दाखल झाले असून चुकीची आणि अवैध खोदाई करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Gold Price Today : सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा उलटफेर ! आज भाव चांगलेच घसरले… जाणून घ्या दर पटापट












