टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत…विधान परिषदेच्या 10 जागांसाठी कुणाकुणाची नावं चर्चेत; संपूर्ण यादी!

Follow Us:

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांची नाव समोर आली आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. (Vidhan Parishad Election 2026)

विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांची नाव समोर आली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. (BJP Shivsena NCP Candidate List Vidhan Parishad Election 2026)

भाजपकडून विधान परिषदेसाठी कोणाच्या नावाची चर्चा? (BJP Vidhan Parishad Election 2026)

  • माधवी नाईक
  • राजेश पांडे
  • रणजितसिंह निंबाळकर
  • राम सातपुते
  • संजय काका पाटील
  • संजय केणेकर
  • प्रज्ञा सातव
  • अर्चना पाटील चाकूरकर
  • दादाराव केचे
  • संजय भेंडे
  • संदीप जोशी
  • दयाशंकर तिवारी

शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी कोणाच्या नावाची चर्चा? (Shivsena Vidhan Parishad Election 2026)

  • नीलम गोऱ्हे
  • रविंद्र फाटक
  • संजय मोरे
  • किरण पावसकर
  • शीतल म्हात्रे
  • शायना एनसी
  • दिपक सावंत
  • बच्चू कडू

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी कोणाच्या नावाची चर्चा? (NCP Vidhan Parishad Election 2026)

  • झिशान सिद्धिकी
  • उमेश पाटील
  • संजय दौंड
  • सुरेखा ठाकरे
  • आनंद परांजपे
  • सुरेश बिराजदार
  • राजेंद्र जैन

ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी कोणाच्या नावाची चर्चा? (Shivsena UBT Vidhan Parishad Election 2026)

  • उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
  • अंबादास दानवे (Ambadas Danve)
  • सुषमा अंधारे (Sushma Andhare)
  • विनायक राऊत (Vinayak Raut)
  • राजन विचारे (Rajan Vichare)
  • वैभव नाईक (Vaibhav Naik)
  • सूरज चव्हाण (Suraj Chavan)

विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

  • उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा)
  • नीलम गोऱ्हे (शिवसेना)
  • शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
  • अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
  • गोपीचंद पडळकर (भाजप)
  • रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
  • राजेश राठोड (काँग्रेस)
  • प्रवीण दटके (भाजप)
  • रमेश कराड (भाजप)

विधान परिषदेची पोटनिवडणूक- (Vidhan Parishad Byelection 2026)

  • प्रज्ञा सातव

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
  • उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
  • उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
  • मतदानाची तारीख: 12 मे 2026
  • मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
  • मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

भाजपने विधान परिषदेसाठी 30 नावं दिल्लीला पाठवली, पण वरिष्ठ नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य, ‘ती’ अट कोणाकोणाचा पत्ता कापणार?

Vidhanparishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे फक्त एक जागा, पण 6 जण रेसमध्ये, कोणाकोणाची नावं चर्चेत?

BJP MLC Election Names : महाराष्ट्र भाजपकडून विधानपरिषदेसाठी 30 नावं केंद्रीय भाजपकडे, केशव उपाध्ये ते रवी अनासपुरेंच्या नावाचा समावेश, राष्ट्रवादीकडून लढलेल्या नेत्याचं नाव यादीत

उद्धव ठाकरेंना समर्थन आहे पण… विधानपरिषद निवडणुकीवर काँग्रेसची मोठी अट, वडेट्टीवार म्हणाले…

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट! eKYC साठी उरले केवळ आठ दिवस, 1500 रुपये होतील कायमचे बंद

Baramati Byelection 2026 Sunetra Pawar: अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी; सुनेत्रा पवारांचा कंठ बोलताना दाटून आला, म्हणाल्या…