Jitendra Awhad : मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Jitendra Awahd : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंबई पोलिसांनी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नितीन देशमुख यांना विधानभवनातून बाहेर घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. सरकारी कामात अडथळा आणल्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

विधानभवनाच्या लॉबीत जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात वाद झाला होता. नितीन देशमुख यांचा शर्ट फाटेपर्यंत मारहाण झाली होती. या प्रकणात विधानभवनाच्या सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप केल्यानं वाद वाढला नाही. या घडलेल्या घटनेप्रकरणी गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. विधानभवनात देखील आमदार सुरक्षित नसल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.

 

विधानभवनातील राड्या प्रकरणी नितीन देशमुख याला ताब्यात घेतल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांकडून पुढील प्रक्रियेसाठी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला नेलं जात होतं. याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या जीपसमोर झोपून त्याला विरोध केला होता. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मरिन ड्राईव्ह स्टेशनला जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल, विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होणं ही सत्तेची मस्ती आहे, असं म्हटलं. मकोकाचा आरोपी असणाऱ्याला विधानभवनात प्रवेश कसा मिळतो.  सीसीटीव्हीत असं आलं आहे की पडळकरांनी इशारा करुन नितीन देशमुखांना मारण्यास सांगितलं असं विजय वडेट्टीवार म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील हल्ला करायचा होता म्हणून गुंड विधानभनवाच्या आवारात आणले गेले होते, असा त्यांनी आरोप केला होता, आम्हाला पण तशा गोष्टी दिसतात. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर  हे राज्य कायद्याचं राज्य राहिलं नाही. सरकारच्या मर्जीनुसार चालणारं राज्य झालंय.  जो सरकारच्या विरोधात आवाज उठवेल त्याच्यावर गुन्हा दाखल करु त्याला संपवून टाकू ही सत्तेची मस्ती आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon