Uddhav and Raj Thackeray: संजय राऊत यांच्या नातीच्या बारश्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित झाले आहेत. मुंबईतील एमसीए क्लब येथे राऊतांच्या नातीच्या बारश्याकरता ठाकरे कुटुंब उपस्थित आहे. संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधुंची एकत्रीत उपस्थिती दिसली. हे मराष्ट्रातील तमाम ठाकरेप्रेमींसाठी सुखद चित्र आहे. उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरेही संजय राऊतांच्या नातीच्या बारश्याला उपस्थित झाले. तसेच यानंतर सुप्रिया सुळे यांनीदेखील या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबातील राज आणि उद्धव यांच्या भेटींनी गेल्या वर्षभरात नवी लाट उसळली आहे. २००५ च्या फुटीनंतर दशकभरातील शांततेला छेद देऊन, या भेटींमुळे शिवसेना (यूबीटी) आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चेला उधाण आले. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटी मराठी माणसाच्या एकजुटीचे प्रतीक ठरल्या. केंद्रीय भाषा धोरणाविरोधात एकत्र येण्यापासून कुटुंबीय सोहळ्यांपर्यंत प्रमुख भेटींनी राजकीय समीकरणे बदलली. याबद्दल जाणून घेऊया.

ठाकरे कुटुंबातील नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यांमध्ये राज आणि उद्धव यांची अनपेक्षित भेट झाली. १५ डिसेंबरला रश्मी ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नप्रसंगी राज उपस्थित होते, तर २२ डिसेंबरला राज यांच्या भाच्याच्या लग्नात दोघे प्रत्यक्ष बोलले. ही भेट कौटुंबिक असली तरी, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय सलोख्याची सुरुवात मानली जाते. यामुळे मराठी मतदारांच्या एकजुटीवर चर्चा सुरू झाली.
संबंधित बातम्या




